आज भगवान महावीरांच्या जयंती निमित्त देशातील प्रत्येक शहरांमध्ये शोभायात्रा आणि विविध मंदिरांमध्ये पूजा पाठ सुरु आहेत. मोठ्या उत्साहात भगवान महावीरांची जयंती साजरी केली जात आहे.
तसं पाहायला गेलं तर, भगवान महावीरांची सगळे मंदिर खास आहेत. पण राजस्थानमधील फलना येथील हे जैन मंदिर अधिकच वेगळे आहे.
राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील अत्यंत छोट्या फलना शहरात वसलेलं हे मंदिर ९० किलो सोन्यापासून तयार करण्यात आले आहे. त्यामुळे याची खासियत अन्य मंदिरांपेक्षा वेगळी आहे.
या मंदिराच्या निर्मिती साठी गावातील भक्तांनी सोने दान केले होते त्यातूनच मंदिराची निर्मिती झाली आहे. या ठिकाणी भगवान पार्श्वनाथाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.
आज भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणत आहे. आसपासच्या परिसरातून देखील मोठ्या संख्येने भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात.
फलना गावातील या मंदिराची चर्चा संपूर्ण जगात आहे. विदेशातून देखील मोठ्या प्रमाणात भक्त आणि पर्यटक या ठिकाणी येतात.