वाढत्या इंधन दरांमुळे गाडी खरेदी करताना मायलेज हा महत्त्वाचा घटक बनला आहे. या लेखात कमी बजेटमध्ये सर्वाधिक मायलेज देणाऱ्या काही उत्तम कार्सची माहिती दिली आहे.
कमी किंमतीत मिळेल चांगलं मायलेज, या ५ गाड्यांचे पर्याय जाणून घ्या; एक तर सर्वात सुरक्षित आणि मजबूत
भारतात इंधनाचा दर वाढत असताना, अनेक लोकांसाठी एक महत्त्वाचा विचार “गाडी घेताना किती मायलेज मिळेल?” असा असतो. जर तुमचा बजेट मर्यादा आहे पण तुम्हाला त्याचबरोबर इंधनातही बचत करायची असेल, तर खालील कार्स तुमचे चांगले पर्याय ठरू शकतात.
26
Maruti Suzuki Celerio
ही गाडी आपल्या सेगमेंटमध्ये एक मायलेज चॅम्पियन आहे. अंदाजे 26-27 km/l मायलेज देते. किंमत साधारणपणे ₹5.5 ते 7 लाखांच्या दरम्यान आहे. शहरात चालवायला सोपी, मेंटेनन्स कमी आणि AMT (ऑटोमॅटिक) पर्यायात देखील उपलब्ध आहे.
36
Maruti Suzuki Wagon R
ही “टॉल बॉय” डिझाइनची गाडी आहे, त्यामुळे आतील जागा चांगली आहे. मायलेज सुमारे 25 km/l (पेट्रोल) आहे. किंमत अंदाजे ₹5.5 ते 7.4 लाख दरम्यान आहे.