ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी रात्रीच्या जेवणात कोणते पदार्थ खावेत हे पाहूया.
रात्री भाताऐवजी चपाती खाल्ल्याने पोट कमी होण्यास आणि वजन कमी होण्यास मदत होते.
रात्री भाताऐवजी ओट्स खाऊ शकता. एक कप ओट्समध्ये 7.5 ग्रॅम फायबर असते. हे शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
एका उकडलेल्या अंड्यात फक्त 78 कॅलरीज असतात. त्यामुळे ते खाल्ल्याने भूक कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
कॅलरी कमी असल्यामुळे रताळे खाणे देखील वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगले आहे.
रात्री सफरचंद खाल्ल्याने भूक लवकर शांत होते आणि जास्त खाणे टाळता येते.
अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असलेली ब्लूबेरी खाल्ल्यानेही शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
फायबर भरपूर असलेले नट्स लवकर पोट भरण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतात.
Rameshwar Gavhane