iPhone17 Pro : जर तुम्ही आयफोन १७ प्रो खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरील ब्लॅक फ्रायडे सेलचा फायदा घेऊ शकता. हे दोन्ही प्लॅटफॉर्मवर बँक ऑफर्ससह उपलब्ध आहे.
नुकत्याच लाँच झालेल्या iPhone 17 Pro वर सूट मिळण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Apple चा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन Amazon आणि Flipkart या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सध्या बँक ऑफर्ससह कमी किमतीत उपलब्ध आहे. जरी फ्लॅट डिस्काउंट नसला तरी आकर्षक बँक ऑफर्समुळे हा प्रीमियम आयफोन कमी दरात खरेदी करणे शक्य झाले आहे.
25
डिस्प्ले आणि परफॉर्मन्स: दमदार अपग्रेड्स
यंदाच्या मॉडेलमध्ये Apple ने मोठी सुधारणा केली आहे. iPhone 17 Pro मध्ये 6.3-इंचाचा OLED Super Retina XDR डिस्प्ले असून त्यात 120Hz चा स्मूथ रिफ्रेश रेट दिला आहे. या फोनमध्ये Apple ची सर्वात शक्तिशाली A19 Pro चिपसेट बसवली आहे, जी मल्टीटास्किंग, गेमिंग आणि Apple Intelligence फीचर्स आहेत.
35
कॅमेरा सेटअप: प्रो-लेव्हल फोटोग्राफी
कॅमेराबाबत iPhone 17 Pro नेहमीप्रमाणेच अव्वल कामगिरी करतो. यात 48MP प्रायमरी लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तसेच 18MP फ्रंट कॅमेरामुळे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगची क्वालिटी देखील उत्कृष्ट आहे. फोटोग्राफी आवडणाऱ्यांसाठी ही मोठी अपग्रेड आहे.