How To Break Coconut : कोणतेही साधन न वापरता नारळ कसा फोडावे? यासाठी शेवटपर्यंत नक्की पाहा हा व्हिडीओ
How To Break Coconut : काही जण मोदकाच्या किंवा करजींच्या सारणात करताना त्यामध्ये ओल्या नारळातील केवळ पांढऱ्याशुभ्र खोबऱ्याचाच समावेश राहील, याची काळजी घेतात. कारण खोबऱ्यावर असणारे चॉकलेटी रंगाचे आवरण सारणामध्ये असणे त्यांना अजिबात आवडत नाही. यामुळे बऱ्याचदा नारळाची अख्खी कवड वापराविनाच फुकट जाते. पण आता तसे होणार नाही, कारण या लेखाद्वारे आपण नारळ फोडण्याची सोपी व अनोखी (How To Break Coconut) पद्धत जाणून घेणार आहोत.
सर्वप्रथम आपल्याला नारळातील पाणी बाहेर काढावे लागेल. यासाठी नारळावर असलेल्या तीन डोळ्यांपैकी एका डोळ्यास छिद्र पाडावे व पाणी वाटीमध्ये काढावे.
यानंतर व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे नारळावर असणाऱ्या रेषांवर एखादी जड वस्तू मारावी. असे करताना नारळ फुटणार नाही, याची काळजी घ्या.
गॅसवर जाळी ठेवा आणि त्यावर नारळ गरम करण्यास ठेवावा. गॅस मंद आचेवरच ठेवावा. नारळ चहुबाजूंनी गरम करावा.
नारळ व्यवस्थित गरम झाल्यानंतर करवंटीला तडे जाऊ लागतात.
(Hair Care : लांबसडक, मऊ व मजबूत केस हवेत? वापरा किचनमधील या साहित्यापासून तयार केलेले औषधी पाणी)
नारळ अति प्रमाणातही गरम देऊ नये. कारण नारळाला तेल सुटू लागते.
(आंघोळीच्या कोमट पाण्यात मिक्स करा एक चमचा तूप, मिळतील हे फायदे)
करवंटीला तडे जाऊ लागल्यास गॅस बंद करावा व नारळ थंड होण्यास ठेवून द्यावा.
नारळ (How To Break Coconut Shell Without Breaking It) थंड झाल्यानंतर अलगदपणे खोबरे बाहेर काढावे. यानंतर तुम्हाला नको असल्यास त्यावरील चॉकलेटी रंगाचे आवरण सोलावे. अशा सोप्या पद्धतीने आपण काही मिनिटांतच नारळ सहजरित्या फोडू शकता.
Content/Video Credit Instagram @ashwinisrecipe