केसगळती-थकव्यामुळे आहात त्रस्त? ऋजुता दिवेकरने सांगितलेल्या सुपरफुडचे कराल सेवन तर व्हाल मस्त

Aliv Health Benefits : केस व त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका हवीय? मग जाणून घ्या सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने दिलेली माहिती… 

Harshada Shirsekar | Published : Nov 6, 2023 11:45 AM IST / Updated: Nov 06 2023, 05:27 PM IST
17
आरोग्याची काळजी घेताय?

धकाधकीच्या आयुष्यात आपले आपल्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. वेळेवर नाश्ता-जेवण न करणे, पौष्टिक आहाराचा अभाव, पुरेशा प्रमाणात झोप न घेणे, व्यायाम न करणे, फास्टफुडचे अति सेवन, इत्यादी कारणांमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. शिवाय यामुळे शरीरात व्हिटॅमिन, प्रोटीन अशा कित्येक पोषकघटकांची कमतरता निर्माण होते. याचे वाईट परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने आरोग्यावर पाहायला मिळतात. उदाहरणार्थ सतत थकवा जाणवणे, आळस येणे, केस व त्वचेशी संबंधित समस्या, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे इत्यादी.

(हसताय ना मंडळी? जाणून घ्या लाफ्टर योगचे अगणित फायदे)

27
पौष्टिक आहार

आपल्या आहारामध्ये पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश नसल्याने गंभीर शारीरिक व मानसिक (Health Tips) समस्या निर्माण होतात, हे लक्षात घ्या मित्रांनो. या समस्या टाळण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करा. सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांनीही अशाच एका सुपरफुडबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. या सुपरफुडचे योग्य प्रमाणास सेवन केल्यास आरोग्यास भरपूर लाभ मिळतील. या सुपरफुडचे नाव आहे अळिवाच्या बिया (Garden Cress Seeds Benefits). अळिवाचे सेवन केल्यास आरोग्यास कोणते लाभ मिळू शकतात तसेच कशा पद्धतीने या बियांचा (Aliv Seeds Ladoo Benefits For Skin) आहारात समावेश करावा, याबद्दलही त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

(केसांची होईल भराभर वाढ, असे तयार करा जास्वंदाच्या फुलाचे तेल)

37
शरीरास होतो पोषणतत्त्वांचा पुरवठा

अळीवमध्ये फॉलिक अ‍ॅसिड, लोह, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए यासारख्या पोषणतत्त्वांचा मोठा साठा आहे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच केस-त्वचेशी (Aliv Seeds Ladoo Benefits For Hair) संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळते. शरीरातील रक्ताची कमतरताही भरून निघते. आपण अळिवाचे लाडू, अळिवाची खीर, अळीव (Aliv Seeds Benefits And Side Effects) पाण्यात भिजत ठेवून यानंतर दुधासह त्याचे सेवन करू शकता. अळिवाचे लाडू (Rujuta Diwekar Aliv Ladoo Recipe) कसे तयार करायचे, याची रेसिपी जाणून घेऊया.

(Hair Care Tips : या लालभडक फुलाचा करा वापर, केस होतील इतके जाड-मजबूत की विंचरताना दुखतील हात)

अळिवाच्या लाडूचे सौंदर्यवर्धक फायदे

47
अळिवाच्या लाडूसाठी आवश्यक असणारी सामग्री
  • अळीव - एक वाटी
  • नारळ - एक अख्खे
  • गूळ - अडीच वाटी
  • तूप - दोन चमचे
  • जायफळ पावडर - आवश्यकतेनुसार
57
VIDEO : अळिवाचे लाडू तयार करण्याची पद्धत
  • अळीव एक तासासाठी नारळाच्या पाण्यात भिजत ठेवा.
  • किसलेले ओले खोबरे आणि गूळ भिजलेल्या अळिवामध्ये मिक्स करा.
  • हे मिश्रण 30 मिनिटे तसेच ठेवावे.
  • यानंतर एका कढईमध्ये तूप वितळवून हे मिश्रण परतून घ्यावे.
  • लाडूचे मिश्रण नीट शिजेपर्यंत ते परतत राहा.
  • मिश्रण शिजल्यानंतर गॅस बंद करावा.
  • मिश्रण थंड होऊ द्यावे. यामध्ये जायफळ पावडर मिक्स करा व लाडू वळून घ्या.
67
लाडू किती दिवस टिकून राहतात?

ऋजुता दिवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अळिवाचे लाडू आपण फ्रीजमध्ये ठेवल्यास 10 दिवस टिकून राहू शकतात. फ्रीजमध्ये न ठेवल्यास केवळ तीन दिवसच हे लाडू चांगले राहू शकतील. त्यामुळे आपल्या आवश्यकतेनुसार लाडू तयार करावेत.

अळीवबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती : VIDEO 

77
VIDEO : अळिवाचे सेवन करण्याची योग्य पद्धत (Best Ways To Eat Aliv Seeds)

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Share this Photo Gallery