Kabir Das Jayanti 2024 : संत कबीरदास यांच्या प्रेरणादायी विचारात दडलेय सुखी आयुष्याचे रहस्य, घ्या जाणून

Kabir Das Jayanti 2024 : आज कबीरदास जयंती साजरी केली जातआहे. कबीरदास यांच्या दोह्यांमध्ये आयुष्याचा अर्थ आणि आयुष्यातील प्रत्येक दु:खावर उपाय दिला आहे. जाणून घेऊया संत कबीरदास यांचे प्रेरणादायी विचार सविस्तर...

Chanda Mandavkar | Published : Jun 22, 2024 4:30 AM IST

Kabir das Jayanti 2024 Quotes : कबीरदास जयंती येत्या 22 जूनला साजरी केली जात आहे. यंदा संत कबीरदास यांची 674वी जयंती आहे. कबीरदास यांनी समाजात फैलावलेल्या अंधविश्वास, रुढीवादी परंपरा आणि ढोंगीपणाचा नेहमीच विरोध करत माणूसकीला नेहमीच प्राधान्य दिले. याशिवाय संत कबीरांनी त्यांचे दोहे आणि विचार याच्या माध्यमातून जनमानसावर प्रभाव टाकला होता. आजही कबीरांचे दोहे आयुष्यातील काही सत्य गोष्टी सांगतात. याच दोह्यांमध्ये आयुष्य आणि यशाचे गुपित दडले आहे.

संत कबीर यांचे प्रेरणादायी विचार

निंदक नियेरे राखिये, आंगन कुटी छवायें।
बिन पानी साबुन बिना, निर्मल करे सुहाय।

अर्थ : संत कबीर म्हणतात की, आपली निंदा करणाऱ्या व्यक्तीला आपल्याच अंगणात एक झोपडी बांधून देत तेथे स्थान द्यावे. कारण आपले अवगुण साबण आणि पिण्याशिवाय निर्मळ होतात. ज्यावेळी एखादा व्यक्ती आपली निंदा करतो आणि अशाच व्यक्ती आपल्या आजूबाजूला असल्यास तुमच्यामधील वाईट गोष्टींची तुम्हाला जाणीव करुन देत असतो.

जंत्र मंत्र सब झूठ है, मति भरमो जग कोये।
सार शब्द जानै बिना, कागा हंस ना होये।

अर्थ : कबीरदास म्हणतात की, जंत्र मंत्र सर्वकाही थोतांड आहे. यामुळे बुद्धी भ्रष्ट होते. यामुळे सर्वच गोष्टींकडे लक्ष देऊ नका. याच्या जाळ्यात अडकून व्यक्तीला चूक आणि बरोबर यामधील फरक विसरुन जातो. जोवर शब्दाचे ज्ञान नाही तोवर मनुष्य ज्ञानी होऊ शकत नाही. या प्रमाणेच आयुष्यातील मूळ तत्वे आणि मंत्र जाणून घेतल्याशिवाय कावळा सुद्धा हंस होऊ शकत नाही.

धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होए।
माली सींचे सौ घड़ा, ऋतु आए फल होए।

अर्थ : संत कबीर म्हणतात की, आपण धैर्याने णि नियमित रुपात आपले काम करत राहिले पाहिजे. वेळ आल्यावरच त्याचे फळ मिळते. जसे एक माळी एका झाडाला घडाभर पाणी देतो पण ऋतू आल्यानंतरच त्यावर फळ येते. म्हणजेच धैर्याचे फळ गोड असते.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Vat Purnima 2024 : वटपौर्णिमा निमित्त Wishes, Messages, HD Images, WhatsApp Status आणि शुभेच्छापत्र शेअर करत साजरा करा सण

Chaturmas 2024 : यंदा कधीपासून सुरु होणार चातुर्मास? 4 महिने शुभ कार्य करणे असणार वर्ज्य

Share this article