केस गळती आणि मजबूत केसांसाठी उपाय करुनही काहीही होत नाही? करा ही 3 योगासने

Yoga for Hair : केस गळतीच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करु शकता. अशी काही योगासने आहेत ज्याच्या मदतीने केसांची वाढ आणि केस मजबूत होण्यास नक्कीच फायदा होईल. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...

Chanda Mandavkar | Published : Jun 21, 2024 4:45 AM IST / Updated: Jun 21 2024, 11:50 AM IST

Yoga for Hair Growth : योगाभ्यासामुळे तुम्ही दीर्घकाळ काही आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. याशिवाय दररोज योगाभ्यास केल्याने त्वचा आण केसांचे आरोग्य राखले जाते. सध्या बहुतांशजण केस गळती, पातळ केस अथवा केसांसंदर्भात काही समस्यांचा सामना करताना दिसून येतात.

केस गळण्यामागील सर्वसामान्य कारणे म्हणजे तणाव, पोषण तत्त्वांची कमतरता, केसांच्या मूळांजवळ अत्याधिक तेल जमा होणे, थायरॉइड अशी आहेत. याशिवाय केसांना रंग लावणे अथवा ब्लीच केल्यानेही केसांची नैसर्गिक चमक निघून जाते. अशा समस्यांचा तुम्ही करत असाल तर पुढील काही उपयांसह योगासनांची देखील मदत घेऊ शकता.

बालासन
पोटासंबंधित समस्या आणि तणावापासून दूर राहण्यासाठी बालासन सर्वाधिक उत्तम आसन आहे. केस गळतीचा सामना करत असल्यास तुम्ही दररोज बालासन करू शकता. याशिवाय एंग्जायटीची समस्या असल्यासही बालासन करणे नक्कीच फायदेशीर ठरेल.

सर्वांगासन
सर्वांगासन केल्याने तुमच्या शरिराचे पॉश्चर व्यवस्थित होऊ लागते. याशिवाय केसांची वाढ होण्यासही मदत होते. खरंतर, सर्वांगासन केल्याने डोक्यापर्यंत रक्त पुरवठा सुरळीत होणे ते कोरडे केस आणि पातळ केसांसाठी फायदेशीर ठरते.

शीर्षासन
केसांसंबंधित समस्यांपासून दूर राहण्यासाठी शीर्षासन करु शकता. यामुळे शरिरातील रक्त प्रवाह सुरळीत सुरु राहते. केस पातळ होणे, केस गळणे अशा समस्यांपासून तुम्ही दूर राहता. याशिवाय केस पांढरे होत असल्याच्या समस्येचा सामना करत असाल तर दररोज शीर्षासन करू शकता.

आणखी वाचा : 

फर्टिलिटी वेगाने वाढवण्यासाठी दररोज करा ही 6 सोपी योगासने

मधुमेहाच्या रुग्णांसाठी 3 उपयुक्त योगा टिप्स, रक्तातील साखरही राहील नियंत्रणात

Read more Articles on
Share this article