Published : Jul 06, 2024, 08:48 AM ISTUpdated : Jul 12, 2024, 04:50 PM IST
अनंत आणि राधिकाचा संगीत सोहळा 5 जुलैला मुंबईतील NMACC येथे आयोजित करण्यात आला होता. संगीत सेरेमनीला अनेक कलाकरांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले. तर संगीत सेरेमनीमधील कोणच्या लूकची चर्चा झाली तर कोणाचा लूक फिका पडला याचे काही फोटो पाहूया….
अनंत-राधिकाचा संगीत सोहळा नुकताच 5 जुलैला मुंबईतील NMACC येथे पार पडला. संगीत सोहळ्यासाठी अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटने एण्ट्री केल्यानंतर सर्वजण त्यांच्याकडे पाहत राहिले. संगीतसाठी अनंतने नेव्ही ब्लू अँड गोल्डन शेरवानी परिधान करत शाही लूक क्रिएट केला होता. तर राधिकाने ऑफ शोल्डर ब्लाऊजसह शानदार लेहेंगा परिधान केला होता. यामध्ये राधिका अत्यंत सुंदर दिसत होती. पापाराझींसमोर पोज दिल्यानंतर कपलने त्यांच्यासोबत सेल्फी फोटो देखील काढले.
210
इशा अंबानीचा हॉट लूक
अनंत अंबानीची बहिण इशा अंबानीने संगीत सेरेमनीसाठी हॉट लूक क्रिएट केला होता. इशाने कस्टमाइज केलेली Couture साडी नेसली होती. ही साडी Schiaparelli यांनी डिझाइन केली होती. रॉयल ब्लू रंगातील साडीवर इशाने सिल्व्हर रंगातील शिमरी ब्लाऊज परिधान केले होते.
310
दीपिकाची साडीतील अदा
अभिनेत्री दीपिका पादुकोणने हेव्ही अॅम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आलेले ब्लाऊज निळ्या रंगातील साडीवर परिधान केले होते. गळ्यात मल्टीलेअर पर्ल नेकलेसला शोभतील असेच कानातले देखील घातले होते. दीपिका साडीत अत्यंत सुंदर दिसत होती.
410
कपूर Vs कपूर फॅमिलीचा ब्लॅक आउटफिट्समधील अंदाज
अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीसाठी कपूर फॅमिलीने काळ्या रंगातील आउटफिट्सची निवड केली होती. आलियाने काळ्या रंगातील हेव्ही वर्क असणारा लेहेंगा परिधान केला होता. त्यावर शोभतील असे हेव्ही कानातलेही घातले होते.
510
महेंद्र सिंह धोनी आणि साक्षीचा पेस्टल आउटफिट्समधील लूक
संगीत सेरेमनीसाठी महेंद्र सिंह धोनी पत्नी साक्षीसोबत आला होता. साक्षीने सुंदर असा आयव्हरी लेहेंगा परिधान करण्यासह फार कमी ज्वेलरी घातली होती. तर एमएस धोनीने साक्षीच्या लूकला मॅचिंग अशी आयव्हरी शेरवानी परिधान केली होती.
610
सलमान खानच्या टक्सिडोमधील सिंपल लूक
सलमान खानला बहुतांश पार्टी-फंक्शनमध्ये काळ्या रंगातील आउटफिट्समध्ये स्पॉट करण्यात आले आहे. अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीलाही सलमान खानने काळ्या रंगाती टक्सिडो सूट परिधान केला होता.
710
बॉलिवूडमधील कपल
बॉलिवूडमधील कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीला उपस्थिती लावली होती. याशिवाय वरुण धवन पत्नी नताशासोबत आला होता. तर करिश्मा तन्ना पती वरुण बंगेरासोबत आली होती.
810
जान्हवी कपूरचा हटके अंदाज
जान्हवी कपूरने संगीत सेरेमनीवेळी सर्वांच्या नजरा आपल्या लूककडे वळवल्या. जान्हवीने मोराच्या पंखांचा लेहेंगा परिधान केला होता. यावर शिमरी ब्लाऊजही घातले होते. जान्हवीचा संगीतमधील लूक अत्यंत हटके आणि सुंदर होता.
910
सारा, नव्या नवेली नंदा आणि खुशी कपूरचा लूक
अनंत आणि राधिकाच्या संगीत सेरेमनीला सारा अली खान, नव्या नवेली नंदा आणि खुशी कपूरने हटके अंदाजात एण्ट्री केल्याचे दिसून आले.
1010
अनन्या पांडे आणि पलकचा लूक
संगीत सेरेमनीला अनन्या पांडेने गोल्डन आणि सिल्व्हर रंगातील शिमर साडी नेसली होती. तर पलकने नारंगी रंगातील फ्लोरल लेहेंगा परिधान केला होता.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.