सेतू बंधासन अथवा ब्रिज पोज केल्याने नितंबाच्या येथील हाडांना बळकटी मिळते. याशिवाय प्रजनन क्षमता वाढते आणि हार्मोन्सचा स्तर नियंत्रित राहते. ब्रिज पोज करण्यासाठी आपले गुडघे 90 डिग्री मध्ये घेऊन येत पाठ वरच्या दिशेने उचला. यावेळी हात जमिनीवरच राहू द्या. या स्थितीत 30 सेकंद ते 1 मिनिटांपर्यंत राहू शकता.