घरच्या घरी चटपटीत वडापाव कसा बनवावा?

Published : Apr 15, 2025, 12:42 PM IST

घरच्या घरी चटपटीत वडापाव बनवण्यासाठी सोपी रेसिपी! बटाटा वड्यासाठी लागणारे साहित्य, पीठ कसे तयार करावे आणि तळण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. तसेच, वडापाव अधिक चविष्ट बनवण्यासाठी काही टिप्स.

PREV
17
घरच्या घरी चटपटीत वडापाव कसा बनवावा?

वडापाव हा महाराष्ट्रातील लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, जो अगदी घरच्या घरीही चविष्टपणे बनवता येतो. वडापाव सोबत चटणी खाल्यावर चांगली चव येते. 

27
साहित्य

बटाटे – 4 मध्यम आकाराचे (उकडलेले आणि मॅश केलेले), हिरव्या मिरच्या – 2, आले-लसूण पेस्ट – 1 चमचा, हळद – 1/4 चमचा, मोहरी – 1/2 चमचा, कडीपत्ता – 6-8 पाने, हिंग – एक चिमूट, मीठ – चवीनुसार, कोथिंबीर – 2 चमचे (बारीक चिरलेली), तेल – फोडणीसाठी, बेसन – 1 कप, हळद – 1/4 चमचा, लाल तिखट – 1/2 चमचा,मीठ – चवीनुसार, सोडा – एक चिमूट, पाणी – गरजेनुसार, तेल – तळण्यासाठी, पाव – 6, लसूण चटणी / सुकी चटणी, हिरवी चटणी, तांबडी चटणी, तळलेली हिरवी मिरची

37
बटाटावडा तयार करण्यासाठी

कढईत थोडं तेल गरम करा. त्यात मोहरी, हिंग, कडीपत्ता टाका. त्यात आले-लसूण पेस्ट, मिरच्या टाका आणि १ मिनिट परता. आता त्यात हळद व उकडलेले बटाटे घालून नीट मिक्स करा. कोथिंबीर टाका आणि गॅस बंद करा. मिश्रण थंड होऊ द्या. त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा.

47
पीठ तयार करा

बेसन, हळद, लाल तिखट, मीठ, सोडा एकत्र करून त्यात थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या न करता पीठ तयार करा. हे पीठ न खूप पातळ न खूप घट्ट असावं.

57
वडे तळा

कढईत तेल गरम करा. तयार बटाट्याचे गोळे बेसनाच्या पिठात बुचकळा आणि मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्या.

67
वडापाव तयार करा

पाव मधोमध कापा, पण पूर्ण न तोडता. त्यात लसूण चटणी, हिरवी चटणी लावा. त्यात गरमागरम वडा ठेवा. सोबत तळलेली मिरची सर्व्ह करा.

77
टीप

पाव थोडासा तूप/लोणी लावून खरपूस भाजल्यास चव अधिक वाढते. तांबडी चटणी झणझणीत असल्यास वडापाव अजून स्वादिष्ट लागतो.

Recommended Stories