स्ट्रेच मार्क्सला करा गुडबाय, या 5 नैसर्गिक वस्तूंनी करा घरगुती उपाय

Published : Apr 15, 2025, 08:56 AM IST

Remedies for stretch marks : वजन कमी होणे किंवा प्रेग्नेंसीच्या स्थितीत महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात. अशातच त्वचेवर स्ट्रेच मार्क आल्याचे दिसून येते. या स्ट्रेच मार्क्सच्या समस्येवर काही घरगुती उपाय करू शकता.

PREV
16
स्ट्रेच मार्क्सची समस्या

स्ट्रेच मार्क्स अशी एक समस्या आहे याचा खासकरुन गर्भवती महिलांना सामना करावा लागतो. गर्भावस्थेदरम्यान, महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. यामुळे पोटावर स्ट्रेच मार्क्स येतात. अशातच महिलांचा आत्मविश्वासही ढासळला जातो. यावर घरगुती उपाय काय जाणून घेऊया.

26
एलोवेरा जेल

एलोवेरामध्ये नैसर्गिक उपचार गुणधर्म असतात. हे त्वचेला मॉइश्चराईज करतं आणि नवीन पेशींची वाढ वाढवते.

असा करा वापर :
ताज्या एलोवेरा पानातून जेल काढा आणि ते स्ट्रेच मार्क्सवर हलक्या हाताने मसाज करत लावा. १५-२० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. दररोज वापरल्यास चांगला परिणाम दिसतो.

36
नारळाचे तेल

नारळाच्या तेलामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचा सुदृढ ठेवण्यास मदत करतात.

असा करा वापर :
रात्री झोपण्यापूर्वी स्ट्रेच मार्क्सवर कोमट नारळ तेल लावून 5-10 मिनिटे मसाज करा.

46
बदामाचे तेल

 बदामाच्या तेलामध्ये 'विटॅमिन ई' भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेला पोषण देते आणि स्ट्रेच मार्क्स कमी करायला मदत करते.

असा करा वापर :
दररोज बदाम तेलाने स्ट्रेच मार्क्सवर हलकासा मसाज करा. परिणाम दिसण्यासाठी सातत्य ठेवा.

56
लिंबाचा रस

लिंबामध्ये अ‍ॅसिडिक गुणधर्म असतात, जे त्वचेचा रंग सुधारण्यास आणि स्ट्रेच मार्क्स फिके करण्यास मदत करतात.

असा करा वापर :
लिंबाचा रस थेट स्ट्रेच मार्क्सवर लावून १० मिनिटं ठेवा, नंतर कोमट पाण्याने धुवा. यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

66
साखरेचा स्क्रब

साखर हा एक नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे, जो डेड स्किन दूर करतो आणि त्वचा उजळवण्यास मदत करतो.

असा करा वापर :
1 चमचा साखर, थोडं लिंबाचा रस आणि बदाम तेल एकत्र करून पेस्ट तयार करा. हे मिश्रण स्ट्रेच मार्क्सवर 5-10 मिनिटे घासून लावा आणि नंतर धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा वापरल्यास चांगले परिणाम मिळतात.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Recommended Stories