- सगळ्यात आधी बोनलेस चिकन स्वच्छ धुऊन त्याचे छोटे तुकडे करून घ्या. त्यात हळद, लाल तिखट, आलं-लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करा. हे सुमारे ३० मिनिटं बाजूला ठेवा.
२. गॅसवर एक पॅन ठेवा. त्यात धणे, मेथी, मोहरी, जिरं, दालचिनी, लवंग, वेलची आणि हरभरा डाळ घालून चांगला सुगंध येईपर्यंत भाजा. नंतर हे मसाले थंड होऊ द्या आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
३. आता एका कढईत थोडं जास्त तिळाचं तेल टाकून गरम करा. त्यात आधीच मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे टाकून चांगले परतून घ्या. चिकनचे तुकडे छान शिजून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मध्यम आचेवर परता.
४. चिकन चांगलं शिजल्यावर त्यात तयार केलेला मसाला पावडर घालून मिक्स करा. मसाला चिकनच्या सगळ्या तुकड्यांना लागेल असा व्यवस्थित ढवळून घ्या.
५. मसाला चिकनमध्ये चांगला मिसळेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर शिजू द्या. चिकन पूर्ण शिजून लोणच्यासारखं दिसू लागल्यावर गॅस बंद करा. झालं, तुमचं मस्त झणझणीत आंध्र स्पेशल चिकन लोणचं तयार आहे.