मँगो फालुदा हा उन्हाळ्यातील एक अत्यंत स्वादिष्ट, थंड आणि आकर्षक डेझर्ट आहे. घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मँगो फालुदा तयार करू शकता. खाली दिली आहे.
आंबा – 2 मध्यम आकाराचे, दूध – 2 कप, साखर – 2 टेबलस्पून, फालुदा सेव – 1/4 कप, साबुदाण्याच्या बिया / तुकमरी बी (बेसिल सीड्स) – 1 टेबलस्पून, व्हॅनिला आइसक्रीम / मँगो आइसक्रीम – 2 स्कूप, सुका मेवा – बदाम, काजू, पिस्ता
आंब्याचा गर मिक्सरमध्ये घालून प्युरी बनवा. थोडा गर सजावटीसाठी बाजूला ठेवा.
थंड दूधामध्ये साखर घालून ढवळा आणि तेही फ्रिजमध्ये ठेवा.
फालुदा सेव उकळून थंड करा. तुकमरी बी 15-20 मिनिटं पाण्यात भिजवा.
एक ग्लास घ्या. त्यात खाली तुकमरी बी, नंतर फालुदा सेव, मग मँगो प्युरी, त्यावर थंड दूध, मग आइसक्रीम, वरून थोडा मँगो गर आणि ड्रायफ्रूट्स घाला.
vivek panmand