तांदळाच्या इडलीला एक आरोग्यदायी पर्याय म्हणून ज्वारीची इडली खाल्ली जाते. ज्वारी ग्लूटेन-मुक्त असून फायबर आणि कॅल्शियमने परिपूर्ण आहे, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
घरच्याघरी ज्वारीची बनवा इडली, झटपट वजन होईल कमी; रेसिपी वाचून म्हणाल ५ मिनिटात इडली तयार
आपण घरी अनेकदा इडली खात असतो, बाहेर गेल्यानंतर हेल्दी आहे म्हणून इडली खाण्याला प्राधान्य दिलं जातं. आपण तांदळापासून बनवलेली इडली खात असतो पण ज्वारीची इडली हि गोष्ट तुम्ही कधी ऐकलीय का?
26
ज्वारीमध्ये काय असतं?
ज्वारीमध्ये आरोग्याला हितकारक अशाच गोष्टी असतात. ग्लूटेन मुक्त धान्य ज्वारीमध्ये असल्यामुळं त्याचा आहारात जास्तीत जास्त वापर केला जातो. त्यामध्ये फायबर आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर असतं.
36
ज्वारीमुळं वजन होतं कमी
ज्वारीच्या इडल्या या खायला हेल्दी असतात. त्यामध्ये फायबर आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर असतं. वजन कमी करण्यासाठी ज्वारी गरजेची असल्याचं सांगण्यात आलं आहे.
रात्री भिजवलेल्या काळी हरभरा डाळीचा वापर करून पीठ बनवा. धुतलेल्या ज्वारीच्या पिठाला बारीक वाटलेल्या रव्याच्या पिठात मिसळा.
56
मीठ घातल्यानंतर इडलीच्या साच्यांना तेल लावून घ्या
या सगळ्यामध्ये मीठ घाला आणि ते आंबून घ्या. त्यानंतर इडलीच्या साच्यांना तेल लावा.
66
इडली खायला झाली तयार
या साच्यामध्ये ३/४ भाग पीठाने भरून घ्या. झाकण ठेवून १० ते १२ मिनिटे वाफवून घ्या. त्यानंतर खुसखुशीत इडली आपली तयार होईल आणि हि इडली आपण सांबर आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊन घ्या.