हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, भिजवलेल्या ड्राय फ्रुट्सचा डाएटमध्ये समावेश करावा. यामध्ये फायबर, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन अशी पोषण तत्त्वे असतात. यामुळे काही आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.
Tips for Dry Fruits : ड्राय फ्रुट्स किती वेळ भिजवून ठेवावेत हे तुम्हाला माहितेय का? खरंतर, ड्राय फ्रुट्सचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, भिजवलेल्या ड्रायफ्रुट्समध्ये काही पोषण तत्त्वे असतात. यामुळे काही आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
किती वेळ भिजवावेत ड्राय फ्रुट्स?
ड्राय फ्रुट्स 6-8 तास भिजवून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे ड्राय फ्रुट्स रात्रीच्या वेळेस भिजत ठेवावेत. जेणेकरुन आठ तासांपर्यंत ते भिजले जातील. दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशी पोटी खाता येऊ शकतात. याशिवाय भिजवलेले ड्राय फ्रुट्स लवकर पचलेही जातात.
अंजीर, खजूर किती वेळ भिजवावेत?
अंजीर, खजूरसारखे ड्राय फ्रुट्स 3-4 तासांसाठी भिजवून ठेवावेत. याशिवाय काजू किंवा हेजल नट्ससारखे ड्राय फ्रुट्स न भिजवता खाऊ शकता. पण बदाम, अक्रोड, अंजीर भिजवून खाणे फायदेशीर ठरू शकते.
आरोग्यासाठी फायदेशीर
तुम्ही दिवसाची सुरुवात भिजवलेल्या ड्राय फ्रुट्सने करत असाल तर संपूर्ण दिवसभर उत्साही वाटेल. याशिवाय गट हेल्थ सुधारण्यासाठी भिजवलेले ड्राय फ्रुट्सचे सेवन करू शकता. म्हणजेच पोटासंबंधित समस्या दूर राहतील. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासही मदत होते.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :