थंडीच्या दिवसात सातत्याने स्टीलच्या बॉटलमध्ये गरम पाणी ठेवून प्यायले जाते. यामुळे बॉटलमध्ये पांढऱ्या रंगाचा बुरशीसारखा स्तर जमा होऊ लागतो. अशातच बॉटल स्वच्छ करुन पुन्हा पाणी भरावे. जाणून घेऊया गरम पाण्याची बॉटल धुण्यासाठी सोपा उपाय...
स्टीलच्या बॉटलमध्ये सातत्याने पाणी ठेवल्यानंतर आतमध्ये पांढऱ्या रंगाची एक लेअर तयार होते. यामुळे बॉटलची स्वच्छता करणे फार गरजेचे आहे. यासाठी लिंबासह अन्य काही घरगुती वस्तूंचा वापर करुन स्टीलची बॉटल स्वच्छ करू शकता. याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया...
लिंबू आणि बेकिंग सोडा
स्टीलच्या बॉटलमध्ये 2-3 चमचे लिंबाचा रस टाका.
बॉटलमध्ये 1 चमचा बेकिंग सोडा मिक्स करुन दोन्ही सामग्री एकत्रित केल्यानंतर फेस येईल.
बॉटलमध्ये गरम पाणी भरुन 10-15 मिनिटांसाठी ठेवा.
बॉटल क्लिनींग ब्रशच्या मदतीने आतमधून स्वच्छता करा.