हनीमून पॅकेज बुकिंग करणे फायद्याचे की तोट्याचे? घ्या जाणून

Published : Apr 16, 2025, 09:31 AM IST

Honeymoon Package Booking : लग्नानंतरचा हनीमून हा प्रत्येक नवविवाहित जोडप्यासाठी एक खास आणि अविस्मरणीय अनुभव असतो. त्यामुळेच अनेक जोडपे हनीमूनसाठी खास पॅकेज खरेदी करण्याचा विचार करतात. पण प्रश्न असा आहे की, हे पॅकेज खरंच फायदेशीर ठरतात का?

PREV
16
हनीमून पॅकेज म्हणजे काय?

हनीमून पॅकेज ही एक अशी सेवा आहे जिथे प्रवास एजन्सीज, टूर ऑपरेटर्स किंवा हॉटेल्स एकत्रितपणे तुमच्या हनीमूनसाठी आवश्यक गोष्टींची आखणी करून देतात – जसे की फ्लाइट्स, हॉटेल बुकिंग, स्थानिक पर्यटन, जेवण आणि काही वेळा खास रोमँटिक अ‍ॅक्टिव्हिटीजसुद्धा.

26
हनीमून पॅकेजचे फायदे:
  • टेंशन-फ्री प्लॅनिंग :
     तुमच्या लग्नाच्या धावपळीच्या काळात ट्रिप प्लॅन करणे अवघड होऊ शकते. पॅकेज घेतल्यास सगळी जबाबदारी एजन्सीची असते.
  • कमी वेळेत सर्व सुविधा : 
    एकाच ठिकाणी बुकिंग केल्यामुळे वेळ आणि मेहनत वाचते.
  • खास ऑफर्स आणि सवलती : 
    बरेच वेळा टूर कंपन्या हनीमून जोडप्यांसाठी विशेष डिस्काउंट किंवा रोमँटिक सेटअप्स देतात.
  • स्थळांची माहिती : 
    स्थानिक मार्गदर्शक किंवा नियोजित टूरमुळे आपण अधिक गोष्टी अनुभवू शकतो.
36
हनीमून पॅकेजचे तोटे
  • स्वातंत्र्य कमी : 
    पॅकेजमध्ये तुम्हाला एक ठरलेली वेळ आणि प्रवासाचा कार्यक्रम असतो, त्यामुळे स्पॉंटेनिअस प्लॅन्स करणे अवघड होते.
  • कधीकधी महाग : 
    स्वतः बुकिंग केल्यास काही वेळा पॅकेजपेक्षा स्वस्तात ट्रिप होऊ शकते.
  • कस्टमायझेशन कमी : 
    काही पॅकेजेसमध्ये आपल्या आवडीनुसार फारसा बदल करता येत नाही.
46
सर्वोत्तम हनीमून पॅकेज कसे निवडावे?
  • तुमच्या बजेटची मर्यादा ठरवा
  • ठिकाण ठरवा
  • ट्रॅव्हल एजन्सी / वेबसाइट्सची तुलना करा
  • रिव्हूज वाचा
  • ट्रॅव्हल कस्टमाइजेश करू शकतो का हे पहा
  • बुकिंग करतानाची तारीख आणि वेळ
56
तर काय करावे?

जर तुम्हाला वेळेची कमतरता असेल, किंवा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय किंवा लांबचा प्रवास करत असाल, तर हनीमून पॅकेज फायदेशीर ठरू शकते. पण जर तुम्हाला प्लॅनिंगची आवड असेल आणि खर्चावर नियंत्रण ठेवायचं असेल, तर स्वतः बुकिंग करणे अधिक चांगले ठरू शकते.

66
या गोष्टीही ठेवा लक्षात
  • हनीमूनला जातेवेळी आवश्यक तेवढेच पैसे पाकिटात ठेवा. 
  • आपत्कालीन फोन क्रमांक लिहिलेली एखादी डायरी ठेवा
  • दुखापत झाल्यास फर्स्ट एड किटही सोबत असू द्या.

Recommended Stories