हिवाळ्यात आणि कोरड्या हवामानात ओठ फुटणे किंवा उकळणे ही सामान्य समस्या आहे. मात्र, योग्य काळजी घेतल्यास ही समस्या टाळता येऊ शकते. त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, तापमानातील बदल, पाणी कमी पिणे आणि योग्य मॉइश्चरायझरचा अभाव यामुळे ओठ कोरडे पडतात आणि फुटतात.
तूप किंवा नारळाचे तेल लावा – ओठांवर तूप किंवा शुद्ध नारळाचे तेल नियमित लावल्याने नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.
पुरेसं पाणी प्या – शरीरात पाण्याची कमतरता असल्यास ओठ जास्त कोरडे पडतात, त्यामुळे दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
हनी + ग्लिसरीन उपाय – मध आणि ग्लिसरीन मिक्स करून झोपण्यापूर्वी ओठांना लावल्यास ओठ मऊ राहतात.
अॅलोवेरा जेलचा वापर – अॅलोवेरा जेल नैसर्गिक मॉइश्चरायझरप्रमाणे कार्य करते आणि कोरडेपणा दूर करते.
ओठ चावू नका किंवा तोंडाने ओलसर करू नका – तोंडाने ओठ ओलसर केल्याने ओठ अधिक कोरडे पडतात आणि त्यावर जळजळ होते.
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील जोशी यांच्या मते, "हिवाळ्यात ओठांच्या त्वचेसाठी योग्य मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे. ओठांवरील त्वचा अतिशय नाजूक असते, त्यामुळे त्यावर हानिकारक रसायने असलेले उत्पादन लावू नये."