भगवान शंकराचे अनोखे मंदिर, जे समुद्रात बुडले जाते; वाचा पौराणिक कथा

गुजरातच्या वडोदरापासून जवळजवळ 40 किलोमीटर दूर असणाऱ्या स्तंभेश्वर महादेवाच्या मंदिराची अनोखी कथा आहे. खरंतर, मंदिर समुद्रात बुडले जाते आणि पुन्हा वरती येते. या मंदिरात दर्शनासाठी दूरवरुन भाविक येतात.

Stambheshwar Mahadev Temple History : भारतातील मंदिरे जगभर प्रसिद्ध आहेत. मंदिरांची सजावट, त्यांच्याशी संबंधित पौराणिक कथा आणि मूर्तींची रचना भक्तांना आश्चर्यचकित करण्याची संधी सोडत नाही. आतापर्यंत आपण अनेक प्राचीन मंदिरे आणि त्यांच्याशी संबंधित कथा ऐकल्या असतील. काही मंदिरे प्राचीन काळातील काही रहस्यांमुळे प्रसिद्ध आहेत, तर काही त्यांच्या चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहेत. गुजरातचे असेच एक खास मंदिर त्याच्या रहस्यमय चमत्कारासाठी खूप प्रसिद्ध आहे. 

भारतात भगवान शंकराची अनेक मंदिरे आहेत. गुजरातचे स्तंभेश्वर महादेव मंदिर आपल्या रहस्यमय चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराचे वास्तविक रहस्य म्हणजे , हे भगवान शंकराचे मंदिर दिवसातून दोनदा आपल्या भक्तांना दर्शन दिल्यानंतर समुद्राच्या कुशीत निद्रिस्त होते. हे असे अदभुत मंदिर गुजरातच्या कावी-कंबोई गावात आहे. हे गाव अरबी समुद्राच्या मध्यभागी कळंबेच्या किनाऱ्यावर आहे. हे रहस्यमय मंदिर दिवसातून फक्त दोन वेळा, सकाळ आणि संध्याकाळ दिसते.शिवभक्तांना दर्शन दिल्यानंतर हे मंदिर समुद्रात नाहीसे होते. असे म्हणतात की हे मंदिर कोणाच्यातरी प्रायश्चिताचे फळ आहे, याचा उल्लेख शिवपुराणातही आहे आणि याच कारणामुळे ते नाहीसे होते.

मंदिराची पौराणिक कथा

शिवपुराणानुसार, तारकासुर नावाच्या एका शिवभक्ताने, असुराने आपल्या तपश्चर्येने भगवान शंकरांना प्रसन्न केले. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्या बदल्यात त्याला इच्छित वरदान दिले. ते वरदान असे होते की त्या असुराचा वध फक्त भगवान शंकर यांचा पुत्रच करू शकतो, आणि त्या पुत्राचे फक्त सहा दिवस असेल. भगवान शंकराला तर पुत्र नव्हता. त्यामुळे तारकासुर स्वतःला चिरंजीवी समजु लागला.

तारकासुराला वरदान मिळाल्याने शिवपुत्र सोडून कोणीही त्या राक्षसाचा वध करू शकत नव्हते. हे वरदान मिळाल्यावर तारकासुरने तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवला. यामुळे व्यथित होऊन सर्व देव आणि ऋषींनी भगवान शंकराला तारकासुराचा वध करण्यासाठी प्रार्थना केली. देवांच्या प्रार्थनेचा स्वीकार केल्यानंतर, पांढर्‍या पर्वत तलावातून 6 दिवसांच्या कार्तिकेयाचा जन्म झाला. कार्तिकेयाने त्याचा वध केला होता, पण नंतर तो असुर निस्सीम शिवभक्त असल्याची माहिती मिळाल्यावर कार्तिकेयला खूप पश्चाताप झाला.

मंदिर हे प्रायश्चिताचे फळ…

जेव्हा कार्तिकेयाला त्याचा पश्चाताप झाला तेव्हा त्याने भगवान विष्णूला प्रायश्चित्त करण्याचा मार्ग विचारला. यावर भगवान विष्णूंनी त्यांना रोज क्षमा मागावी लागेल अशा ठिकाणी शिवलिंग स्थापन करण्याचा उपाय सुचवला. अशा प्रकारे त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. तेच पुढे स्तंभेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. हे मंदिर दररोज समुद्रात बुडते आणि नंतर परत वरती येते. आपल्या कृत्याची क्षमा कार्तिकेय मागायचा आणि मंदिर समुद्रात डूबयाचे. आज देखील तसेच घडत असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक महाशिवरात्री व अमावस्येला स्तंभेश्वर महादेव येथे मोठी यात्रा भरते. या मंदिराला भेट देण्यासाठी पूर्ण दिवसाची वेळ निश्चित करावी, जेणेकरून हा अदभुत चमत्कार पाहता येईल.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Mahashivratri 2025 : भगवान शंकराला पूजेवेळी बेलपत्र का वाहतात?

महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? घ्या जाणून

Share this article