आजकाल मार्केटमध्ये भेसळयुक्त वस्तूंची फार मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. यामुळे बनावट वस्तू खऱ्या असल्याचे वाटतात. अशातच हिंग बनावट आहे की नाही हे पुढे जाणून घेऊया...
हिंगामुळे जेवणाची चव वाढण्यासह काही आजारांवर फायदेशीर ठरते. हिंगामध्ये अँटीऑक्सिडेंट्स, फायबर, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि कार्बोहाइड्रेट्स भरपूर असतात.
हिंगाचा एक खास वास असतो. अशातच बनावट हिंग ओखळण्यासाठी त्याचा एक तुकडा घेऊन गॅसवर जाळा.
हिंगाचा खडा गॅसवर ठेवल्यानंतर त्यामधून चमकदार पदार्थ निघल्यास त्यामध्ये भेसळ नाही असे समजावे.
हिंग बनावट असल्यास त्यामधून कोणत्याही प्रकारचा पदार्थ बाहेर पडणार नाही.