Back and Neck Pain Home Remedies in marathi : सध्या बहुतांशजणांना डेस्क जॉब करत असल्याने कंबर आणि मान दुखण्याचा त्रास निर्माण होते. यावर घरगुती उपाय काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
Back and Neck Pain Home Remedies : डेस्क जॉब करणाऱ्या व्यक्तीला 8-9 तास काम करावे लागते. सध्याच्या काळात सातत्याने बसून काम केल्याने आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. काम पूर्ण झाल्याशिवाय जागेवरुन न उठण्याच्या सवयीमुळे कंबर आणि मान दुखण्याचा त्रास उद्भवला जातो. यावर पेन किलरच्या गोळ्या घेऊन थोडावेळासाठी आराम मिळतो. पण सातत्याने पेन किलरच्या गोळ्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. अशातच कंबर आणि मानदुखीवर घरगुती उपाय काय जाणून घेऊया...
हेही वाचा : डोकं दुखत असेल तर घरच्या घरी करून पहा उपाय, पटकन पडेल फरक
हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्मांमुळे दुखणे आणि सूजेची समस्या कमी होते. याशिवाय हळदीमध्ये करक्यूमिन असल्याने स्नानूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
धणे पावडरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम सारखी व्हिटॅमिन आणि खनिज असतात. यामुळे हाडांना बळकटी मिळते.
मेथीमध्ये असणाऱ्या अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्मांमुळे स्नायूंचे दुखणे कमी होऊ शकते. यामुळे कंबर आणि मानदुखीच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते.
आल्याच्या पावडरमध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असल्याने सूज आणि मानदुखीच्या त्रासापासून आराम मिळतो. याशिवाय शरिरातील रोगप्रतिकारक शक्तीही वाढली जाते.
ओव्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर, प्रोटीन आणि फॅट्स अशी पोषण तत्त्वे असतात. याशिवाय अँटी-इंफ्लेमेंटरी, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अँटी-फंगल गुणधर्म असल्याने शरिराला बळकटी मिळण्यास मदत करतात.
लसूणच्या सेवनाने सूज कमी होणे ते दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी फायदा होतो.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
महिलांनी शरिरातील हार्मोन संतुलित राहण्यासाठी खा हे 7 फूड्स
तिळाच्या लाडूचे सेवन केल्याने या 5 व्यक्तींच्या आरोग्याला धोका