थंडीच्या दिवसात तिळाच्या लाडूचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण काही व्यक्तींसाठी तिळाच्या लाडूचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते.
थंडीत तिळाच्या लाडूचे सेवन केल्याने शरीर आतमधून उष्ण राहण्यास मदत होते. तिळात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, फोलिक अॅसिड आणि लोहसारखी पोषण तत्त्वे असतात.
गुळामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सुक्रोज, ग्लुकोज आणि मॅग्नेशियम सारखी पोषण तत्त्वे असतात. पण काही व्यक्तींसाठी तिळाच्या लाडूचे सेवन करणे नुकसानदायक ठरू शकते.
शुगरची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी तिळाच्या लाडूचे सेवन करणे टाळावे.
वजन अत्याधिक असल्यास तिळाच्या लाडूचे सेवन करणे टाळावे. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
लो बीपी असणाऱ्या रुग्णांनी तिळाच्या लाडूचे सेवन करणे टाळावे. तीळामुळे बीपी कमी होऊ शकतो.
पचनक्रिया सुरळीत होत नसल्यास तिळाच्या लाडूचे सेवन करू नये. यामुळे पोटात दुखणे किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.