सध्या प्रत्येकजण सुंदर दिसण्यासाठी स्किन केअर करण्याकडे अत्याधिक लक्ष देतो. वाढत्या प्रदूषण आणि उन्हामुळे चेहऱ्याचे सौंदर्य काहीवेळेस बिघडले जाते.
चेहऱ्यावर केस येणे एक सामान्य बाब आहे. पण बहुतांश तरुणी चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांमुळे चिंतेत असतात. यावर उपाय काय जाणून घेऊया पुढे...
चेहऱ्यावरील नकोसे केस काढण्यासाठी तुम्ही मध आणि साखरेचा वापर करु शकता. यासाठी साखर आणि मध एकत्रित करुन गरम करा. यापासून तयार झालेल्या वॅक्सने नकोसे केस काढू शकता.
अंड आणि कॉर्न स्टार्चचा वापर करुन चेहऱ्यावरील केस काढू शकता. यासाठी एक वाटीत अर्धा चमचा कॉर्न स्टार्च आणि अंड्याचा पांढरा भाग मिक्स करा. याची पेस्ट चेहऱ्याला लावा.
लिंबू, मध आणि साखरेचा वापर तुम्ही चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी करू शकता. यासाठी एक चमचा साखरेत मध आणि लिंबाचा रस मिक्स करा.यामुळेही चेहऱ्यावरील केस काढण्यास मदत होईल.
ओट्स आणि केळ्याचा वापर करुन तुम्ही चेहऱ्यावरील नकोसे केस काढू शकता. यासाठी स्मॅश केलेल्या केळ्यात ओट्स मिक्स करुन मिश्रण तयार करा. या मिश्रणाने चेहरा मसाज करा.