Health Tips : हिवाळ्यामध्ये गरमागरम भाजलेले शेंगदाणे खाणे सर्वांनाच आवडते. शेंगदाण्यांमध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा साठा आहे, ज्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत मिळू शकते. यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स यासारखे पोषणतत्त्व आढळतात.
याव्यतिरिक्त शरीराचे वजन कमी करणे आणि हृदयविकारांचा धोका कमी होण्यास उपयोगी असलेल्या हेल्दी फॅट्ससह कित्येक पोषक घटकांचाही शेंगदाण्यामध्ये समावेश आहे. पण टाइप -2 मधुमेहाने ग्रस्त असलेल्या (Type 2 Diabetes) रूग्णांनी शेंगदाण्याचे सेवन करावे की करू नये? असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. तसेच शेंगदाणे खाल्ल्याने खरंच मधुमेहाचा धोका वाढू शकतो का? जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती…