फळं-भाज्यांच्या साली टाकून देता? अशा प्रकारे करा वापर

Published : Dec 05, 2024, 01:31 PM IST
Fruit peels

सार

आपल्या सर्वांना माहिती आहे की, फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाची असतात. पण फळं-भाज्यांच्या साली फेकून दिल्या जातात. अशातच भाज्यांच्या सालीचा पुन्हा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया...

Fruits & Vegetables Peels Benefits : भाज्या-फळं आपल्या खाण्यापिण्याचा एक महत्वाचा भाग आहे. हेल्दी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी दूर राहण्यासाठी भाज्या आणि फळांचा समप्रमाणात आपल्या डाएटमध्ये समावेश करावा. खरंतर, बहुतांश भाज्या आणि फळांचे साली काढून झाल्यानंतर टाकून दिल्या जातात. पण तुम्हाला माहितेय का, सालींचा रियुज कसा करायचा? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...

डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी बटाट्याची साल

बटाट्याचा वापर बहुतांश भाजीमध्ये केला जातो. पण बटाट्याची साल फेकून दिली जाते. खरंतर, बटाट्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन आणि एंजाइमसारखे तत्त्वे असल्याने डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी बटाट्याच्या सालीचा वापर करू शतता.

दातांच्या स्वच्छतेसाठी संत्र

दातांना चमक येण्यासाठी केळ किंवा संत्र्याची साल फार फायदेशीर असते. याची साल दातांच्या आतमधील भागात घासल्याने पिवळेपणा दूर होतो. या सालींमध्ये मॅग्नेशियम, मॅग्नीज आणि पोटॅशियम असते.

चमकदार त्वचेसाठी सफरचंद

सफरचंदामध्ये व्हिटॅमिन ई असल्याने त्वचा मऊ आणि हाइड्रेट राहण्यास मदत होते. यामध्ये असणाऱ्या कोलेजनमुळे त्वचा तरुण दिसण्यास मदत होते.

नॅच्युरल किटकनाशक

संत्र्याचा सालीचा वापर करून घरातील किडे-मच्छर दूर पळवू शकता. संत्र आणि लिंबामधील साइट्रसच्या गंधामुळे किडे दूर राहतात. साली खिडकी आणि दरवाज्याजवळ ठेवल्याने किटक दूर जातील.

आणखी वाचा : 

पायऱ्या चढल्याने किंवा सेक्समुळे महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका कमी, वाचा रिपोर्ट

वजन कमी झाल्यानंतर पुन्हा का वाढले जाते? वाचा कारण आणि उपाय

PREV

Recommended Stories

थंडीत हि ज्वेलरी घालून लग्नात करा हवा, स्वेटर-शॉलवर घाला फॅन्सी डिझाइन
पत्नीला भेट द्या 5gm चे सुंदर सुई धागा कानातले, खुप सुंदर दिसतील!