पायऱ्या चढल्याने किंवा सेक्समुळे महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका कमी, वाचा रिपोर्ट

जड शॉपिंग बॅग्स किंवा थोडावेळ पायऱ्यांवरुन चालल्याने महिलांमधील हार्ट अटॅकचा धोका कमी होत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.

Health Report : एका रिसर्च प्रोजेक्टमध्ये महिलांनी जड शॉपिंग्सच्या बॅग्स किंवा थोडावेळ पायऱ्या चालल्यास त्यांच्यामधील हार्ट अटॅकचा धोका कमी होतो असे समोर आले आहे. याशिवाय दररोज केल्या जाणाऱ्या हालचालींमुळेही महिलांमधील हृदयासंबंधित समस्या कमी होतात.

40-79 वयोगटातील 22 हजार ब्रिटीश व्यक्तींवर नुकतेच संशोधन करण्यात आले. यामध्ये दररोज केल्या जाणाऱ्या अ‍ॅक्टिव्हिटी तुमचे आयुष्य दुप्पटीने वाढवण्याचे काम करते. संशोधकांनी कमी वेळात केल्या जाणाऱ्या शारिरीक हालचालींबद्दलही काही गोष्टी सांगितल्या आहेत. वर्ष 2013 ते 2022 च्या दरम्यान केल्या गेलेल्या संशोधनानुसार, महिलांनी जरी 3.4 मिनिट जोरात शारिरीक हालचाल केल्यास त्यांच्यामधील हृदय किंवा रक्तवाहिंन्यांसदर्भातील धोका 45 टक्क्यांनी कमी होते असे संशोधकांना दिसून आले आहे. याशिवाय महिलांमध्ये हार्ट अटॅक आणि 67 टक्के प्रमाणात हार्ट फेल्युअरचा धोका कमी होतो.

याशिवाय दीड मिनिटे जरी अतिवेगाने काही हालचाली केल्यासही हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. सिडनी विद्यापठातील संशोधनातील मुख्य संशोधक प्रोफेसर इम्यॅन्युअल स्टामिटाकिस म्हणतात की, ज्या महिलांना हेव्ही व्यायाम करणे आवडत नाही त्यांनी शरिराची वेगाने हालचाल केल्यानेही आरोग्याला त्याचा फायदा होतो. सुरुवातीला महिला पायऱ्या चढणे किंवा शॉपिंगच्या बॅग्स घेऊन येणे अशा काही गोष्टी करू शकता.

इम्यॅन्युअल स्टामिटाकिस यांनी पुढे म्हटले की, आरोग्यासाठी कोणतीही जादुई उपचार किंवा औषधे नाहीत. आम्ही केलेल्या संशोधनातून असे समोर आले आहे की, थोडावेळासाठी का होईना वेगाने शरिराची केलेली हालचाल दररोज काही तरी करण्याची ताकद किंवा एक्सरसाइज करण्याची सवय लावते. महिलांच्या तुलनेत पुरुषांवरील संशोधनाचे आकडे फार धक्कादायक असल्याचे समोर आले. यानुसार, 5.6 मिनिटे जरी शरिराची हालचाल केल्यास तरी 16 टक्के प्रमाणातच हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. याशिवाय 2.3 मिनिटे हालचाल केल्यास पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचा धोका केवळ 11 टक्क्यांनी कमी होतो.

आणखी वाचा 

वजन कमी झाल्यानंतर पुन्हा का वाढले जाते? वाचा कारण आणि उपाय

चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवाय? कच्च्या दूधात मिक्स करा या 5 वस्तू

Share this article