सणासुदीच्या काळात उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी अशी घ्या आरोग्याची काळजी

Published : Oct 16, 2024, 11:06 AM ISTUpdated : Oct 18, 2024, 10:54 AM IST
Blood Pressure

सार

Managing Blood Pressure During Festival : तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास सणासुदीच्या काळात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जेणेकरुन उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यासह आरोग्यही उत्तम राहिल.

Health Care During Festival : अवघ्या काही दिवसांवरच दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. अशातच नातेवाईक मित्रपरिवार घरी येतात. सणाच्या दिवसात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आणि पेय तयार केली जातात. पण उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी सणासुदीच्या काळात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाल्यास आरोग्यासंबंधित समस्या वाढू शकतात. याशिवाय हृदयरोगाचा झटका येणे किंवा स्ट्रोकचा धोका वाढला जाऊ शकतो. जाणून घेऊया उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी सणासुदीच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल सविस्तर...

उच्च रक्तदाब ठेवा नियंत्रणात
दिवाळीत किंवा कोणत्याही सणावेळी स्नॅक्स आवर्जुन तयार करण्यास खाल्ले जातात. काहीजण पाकिटबंद स्नॅक्स ऑर्डर करतात. यामध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असल्याने उच्च रक्तदाबाची समस्या वाढली जाऊ शकते. अशातच पाकिटबंद पदार्थांपासून दूर रहावे. याएवजी घरच्याघरी तयार केलेले पदार्थ सणासुदीच्या दिवसात खावेत.

सणात घ्या आरोग्याची काळजी
सणासुदीच्या काळात खूप तयारी करायची असते. पाहुण्यांच्या उठण्याबसण्याची व्यवस्था ते घराची स्वच्छता अशा काही गोष्टी करायच्या असतात. याशिवाय कोणत्या ना कोणत्या कामासाठी प्रवास देखील करावा लागतो. अशातच उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी सणाच्या दिवसात अधिक धावपळ करणे टाळावे. याशिवाय दररोज सकाळी योगा किंवा मेडिटेशन करावे. यामुळे आरोग्य हेल्दी राहण्यासह तणावापासून दूर रहाल.

पुरेशा प्रमाणात पाणी प्या
दिवाळीसारख्या सणावेळी हाइड्रेट राहणे अत्यंत गरजेचे आहे. शरिरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तीच्या हृदयावर दबाव पडला जाऊ शकतो. अशातच उच्च रक्तदाबाची समस्या वाढली जाते. याशिवाय चहा, कॉफीचे सेवनही अत्याधिक करु नये. दिवसभरात पुरेशा प्रमाणा पाण्याचे सेवन करावे. जेणेकरुन हाइड्रेट राहण्यास मदत होईल. उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी कोल्ड्र ड्रिंक्स किंवा सोडायुक्त द्रव्यांएवजी हर्बल टी, ग्रीन टी चे सेवन करावे.

आणखी वाचा : 

दिवाळीत मावशीला गिफ्ट करा Hema Malini सारख्या 8 साड्या, खुलेल लूक

Narak Chaturdashi 2024 च्या दिवशी काय करावे आणि काय नाही? घ्या जाणून

PREV

Recommended Stories

iPhone Air चा राहू काळ काही संपेना, आधी विक्री घटली, आता रिसेल व्हॅल्यूही कोसळली!
Horoscope 7 December : आज रविवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल!