Chanakya Niti : पैशांपेक्षा अधिक मौल्यवान असतात आयुष्यातील या 3 गोष्टी

चाणाक्य नीतिनुसार, धर्म, स्वाभिमान, आणि नाते पैशांपेक्षा अधिक महत्वाचे असतात. पैसे पुन्हा कमावता येतात. पण काही गोष्टी पुन्हा कमावणे कठीण असते.

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या नीतिशास्रात आपल्या आयुष्यातील समस्यांचे समाधान दिले आहे. या समाधानांचा आजही दैनंदिन आयुष्यातील काही गोष्टी करताना वापर केला जातो. जाणून घेऊया आयुष्यात पैशांपेक्षा कोणत्या अशा तीन गोष्टी आहेत ज्या फार मौल्यवान मानल्या जातात.

पैशांपेक्षा अधिक मौल्यवान काय?
चाणक्य यांच्यानुसार, पैशांचा गर्व असणे उत्तम बाब नाही. कारण पैशांपेक्षाही काही गोष्टी अधिक महत्वाच्या असतात.

धर्म
चाणक्य नीतिनुसार, पैशांपेक्षा धर्म अधिक मौल्यवान आणि महत्वाचा आहे. धर्म आणि पैशांमधील एक गोष्ट निवडायची असल्याचा धर्म निवडावा.

स्वाभिमान महत्वाचा
चाणक्य म्हणतात की, पैशांपेक्षा स्वत:चा स्वाभिमान महत्वाचा आहे. सन्मानच्या बाबत पैशांकडे पाहू नये. गमावलेले पैसे पुन्हा कमावू शकतो. पण स्वाभिमान नाही.

नाती महत्वाची
नात्यांवेळी पैशांचा विचार करणे मुर्खपणाचे असल्याचे चाणक्य म्हणतात. कारण पैशांशिवाय आयुष्य जगता येतो. पण परिवार आणि नात्यांशिवाय संपूर्ण आयुष्य जगणे कठीण होते.

सेल्फ कंट्रोल
चाणक्य मानतात की, सेल्फ कंट्रोल आयुष्यात असणे फार महत्वाचा आहे. यामुळे दीर्घकालीन लक्ष्य पूर्ण करता येतात.

कोण होते आचार्य चाणक्य
आचार्य चाणक्य एक कुशल रणनीतिकार होते. चाणक्य असे मानायचे की, यशप्राप्तीसाठी राणनीति आखण्याची विचारसणी असावी. याशिवाय आयुष्यभर शिकण्याची आवड असावी असेही चाणक्य सांगतात.

कौटिल्य सिद्धांताच्या रुपात ओळखले जाणारे चाणक्य निती, आयुष्य, प्रशासन आणि व्यक्तिगत विकासाच्या मार्गदर्शनासाठी एक अमूल्य संसाधन आहे. चाणक्य नीतिमधील काही अन्य गोष्टी देखील पाहा-

आणखी वाचा : 

Dhanteras 2024 : दिवाळीआधी धनत्रयोदशी का साजरी करतात? वाचा योग्य तारीख आणि कथा

Narak Chaturdashi 2024 च्या दिवशी काय करावे आणि काय नाही? घ्या जाणून

Share this article