
मोरिंगा, म्हणजेच शेवग्याचं झाड, आयुर्वेदात ‘सुपर फूड’ म्हणून ओळखलं जातं. केवळ शरीरासाठीच नाही, तर टाळूचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि केसांची वाढ नैसर्गिकरित्या घडवण्यासाठीही हे अनमोल आहे. यातील जीवनसत्त्वे आणि अँटी-ऑक्सिडंट्स केसांना जीवनदान देतात.
मोरिंगामध्ये A, B, C, E ही आवश्यक जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. ही जीवनसत्त्वे टाळूच्या पेशींना पोषण देतात, केसांच्या कुपांना बळकटी देतात आणि केसांची पोत सुधारतात. नियमित सेवन केल्यास केस कोरडे आणि निस्तेज राहात नाहीत.
केसांचे प्रोटीन म्हणजे केराटिन. मोरिंगा हे अमिनो अॅसिड्सचं उत्तम स्रोत आहे, जे केराटिन तयार करण्यात मदत करतात. त्यामुळे केस मजबूत, लवचिक आणि तुटणारा होत नाही. हे केस गळती थांबवण्यासही प्रभावी ठरतं.
मोरिंगामध्ये क्वेरसेटिन आणि क्लोरोजेनिक अॅसिडसारखे अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे घटक ऑक्सिडेटिव्ह तणाव दूर करतात, ज्यामुळे टाळूच्या पेशींचं संरक्षण होतं आणि केसांची नैसर्गिक वाढ सुरळीत होते.
टाळूमध्ये योग्य रक्तप्रवाह झाला तर केसांचे मुळे मजबूत राहतात. मोरिंगामध्ये असलेले लोह आणि झिंक हे रक्ताभिसरण सुधारण्यात मदत करतात, त्यामुळे केसांची गती वाढते आणि केस अधिक दाट होतात.
मोरिंगा वॉटर तयार करणं खूप सोपं आहे. फक्त 2-3 शेंगा, 2-3 ग्लास पाणी घ्या. शेंगांचे तुकडे करून उकळत्या पाण्यात 10-15 मिनिटं ठेवा. गाळून थंड करा आणि तयार आहे केसांसाठी पोषणदायक पेय!
सकाळी रिकाम्या पोटी मोरिंगा वॉटर पिल्यास ते अधिक प्रभावी ठरतं. दररोज 1-2 कप पिणं केसांच्या वाढीसाठी आणि शरीराच्या एकंदर आरोग्यासाठी उत्तम आहे. चव वाढवण्यासाठी मध किंवा लिंबू टाकायला हरकत नाही.
मोरिंगा वॉटर केवळ केसांसाठी नाही तर शरीरासाठीही अमृतासारखं आहे. यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन C मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी, ताप, थकवा अशा समस्यांपासून दूर राहता येतं.
मोरिंगा वॉटर हे एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे. हे शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकून यकृत आणि पचनक्रियेचं कार्य सुधारतं. त्वचा आणि केस यांना याचा अप्रत्यक्ष लाभ मिळतो.
मोरिंगामधील दाहनाशक (anti-inflammatory) गुणधर्म टाळूतील जळजळ, खाज, डँड्रफ यांसारख्या समस्यांपासून आराम देतात. त्यामुळे केसांची वाढ अधिक निरोगी आणि संतुलित पद्धतीने होते.