Health : रात्रीच्या वेळी ‘या’ गोष्टी चुकूनही खाऊ नका, या गोष्टीमुळे होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास

ल यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे युरिक अॅसिड वाढल्यास सांधेदुखीची समस्या तसेच किडनीचे आजार यांसारखे आजार होऊ शकतात.

रात्रीच्या वेळी काही पदार्थ खाल्याने शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते. त्यामुळे सांधेदुखी, सूज आणि सांधेदुखीचा धोका अधिक वाढतो. तसेच युरिक ॲसिडमुळे मधुमेह, रक्तदाब आणि थायरॉईडचा धोकाही वाढू शकतो. शरीरात ३.५ ते ७.२ मिलीग्राम प्रति डेसीलिटर यूरिक अॅसिड असावे असे डॉक्टर सांगता. यापेक्षा जास्त प्रमाणात युरिक ॲसिड असेल तर ते क्रिस्ट्ल स्वरूपात सांध्यांमध्ये जमा होते आणि सांधे दुखीचा त्रास सुरु होतो. त्यामुळे शरीरातील युरिक अॅसिड कमी करायचे असेल तर रात्री या गोष्टींचे सेवन टाळा. चला जाणून घेऊया रात्री कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये.

मांस खाऊ नका:

यूरिक ॲसिडचा त्रास असलेल्यानी रात्रीच्या जेवणात मांस खाणे टाळावे. रात्रीच्या जेवणात मटण, रेड मीट, ऑर्गन मीट आणि सी फूड यासारखे खाद्यपदार्थ टाळावेत.त्यामुळे अशा प्रकारचे अन्न खाल्ल्याने यूरिक ॲसिड वेगाने वाढते.

दारू पिणे टाळा:

दारू पिण्याने देखील यूरिक ॲसिड वाढते, मेडिकल न्यूज टुडेच्या मते, युरिक अॅसिडची समस्या असलेल्या लोकांनी रात्रीच्या वेळी दारू पिणे टाळावे.दारूमध्ये प्युरीन नावाचा पदार्थ जास्त प्रमाणात असल्याने शरीरातील यूरिक ॲसिडची पातळी वाढवण्याचे काम करते.

डाळींचे पदार्थ टाळा:

कडधान्यांचे अनेक प्रकार आहेत, काही डाळींमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला युरिक अॅसिडचा त्रास होत असेल तर रात्रीच्या जेवणात डाळ खाणे टाळावे. डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे शरीरात उर्जेचे उत्पादन जास्त होते. आर्थरायटिस हेल्थच्या मते, झोपेच्या वेळी शरीराचे तापमान थोडे कमी होते आणि तापमानातील ही घसरण सांध्यामध्ये यूरिक ऍसिड क्रिस्टल्स तयार करण्यास चालना देऊ शकते. त्यामुळे रात्रीच्या वेळी डाळ खाणे टाळावे.

गोड पदार्थ खाऊ नका:

मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी सर्वसाधारणपणे गोड पदार्थांचे सेवन टाळावे, परंतु संधिवात किंवा संधिरोगाचा त्रास जाणवत असेल तर रात्रीच्या वेळी गोड पेये किंवा पदार्थांचे सेवन टाळावे. गोड गोष्टी तुम्हाला अडचणीत आणू शकतात. यामुळे सांधेदुखीची समस्या वाढू शकते.

आणखी वाचा :

खजूर खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Overthinking : डोक्यातील सततच्या विचारांनी ग्रासले असाल तर हे नक्की वाचा

Holi 2024 : केमिकलयुक्त रंगांना करा गुडबाय, यंदाच्या रंगपंचमीला घरच्याघरी असा तयार करा नैसर्गिक गुलाल (Watch Video)

 

Share this article