Dandruff Remedies : थंडीत केसांमधील कोंड्यावर करा हे घरगुती उपाय, आठवड्यात दिसेल फरक

Published : Oct 27, 2025, 10:30 AM IST

Dandruff Remedies : थंडीत केसांतील कोड्यांची समस्या बहुतांशजणांना उद्भवते. अशातच यावर वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट किंवा काही प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण घरगुती उपायांनी केसांमधील कोंड्यांच्या समस्येपासून दूर राहू शकता.

PREV
15
केसांमधील कोड्यांची समस्या

थंडीच्या हंगामात अनेकांना केसांमध्ये कोरडेपणा, खाज आणि कोडे या समस्यांचा त्रास वाढतो. हवामानातील आर्द्रता कमी झाल्याने टाळू कोरडी पडते आणि त्यामुळे डँड्रफची समस्या वाढते. बाजारात अनेक शॅम्पू आणि हेअर केअर उत्पादने उपलब्ध असली तरी घरगुती उपाय सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात. हे उपाय नैसर्गिक घटकांवर आधारित असल्याने केस आणि टाळूला कोणतीही हानी पोहोचवत नाहीत, उलट त्यांचे पोषण करतात.

25
नारळाचे तेल आणि लिंबाचा रस

थंडीत कोड्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नारळाचे तेल आणि लिंबाचा रस हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. दोन चमचे गरम नारळाच्या तेलात अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा आणि हा मिश्रण टाळूवर हलक्या हाताने मसाज करा. हे मिश्रण टाळूतील कोरडेपणा कमी करते आणि लिंबातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे डँड्रफ निर्माण करणारे जीवाणू नष्ट होतात. मसाजनंतर केस अर्धा तास तसेच ठेवून कोमट पाण्याने धुवावेत. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास लक्षणीय फरक जाणवतो.

35
अलोवेरा जेल

अलोवेरा जेल देखील डँड्रफ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यात असलेले मॉइश्चरायझिंग घटक टाळूला पोषण देतात आणि कोरडेपणा कमी करतात. अलोवेरा जेल थेट टाळूवर लावून २० ते ३० मिनिटे ठेवावे आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवावेत. नियमित वापर केल्याने टाळूची खाज कमी होते आणि केस मऊ, चमकदार दिसतात.

45
दही आणि मेथी दाणे

 दही आणि मेथीची पेस्ट हा देखील जुना आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. एक कप दहीमध्ये दोन चमचे भिजवलेली मेथी दळून मिसळा आणि हा पेस्ट केसांवर लावा. दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिड टाळूतील मृत पेशी काढून टाकते, तर मेथी टाळूला थंडावा देते आणि डँड्रफ कमी करते. हे मिश्रण केसांवर सुमारे ३०-४० मिनिटे ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने धुवून टाका.

55
आहारही महत्वाचा

थंडीत केसांचे कोडे टाळण्यासाठी केवळ घरगुती उपायच नव्हे तर आहार आणि दिनचर्येतील बदल सुद्धा महत्त्वाचे आहेत. पुरेसे पाणी पिणे, हिरव्या भाज्या आणि प्रथिनयुक्त अन्न सेवन करणे यामुळे टाळूला आतून पोषण मिळते. केस कोरडे झाल्यास अतिप्रमाणात गरम पाणी वापरणे टाळावे आणि नियमित तेल मालिश करावी. नैसर्गिक घटकांचा वापर आणि संतुलित आहार यामुळे थंडीतही केस निरोगी, मऊ आणि कोड्याविरहित राहतात.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Read more Photos on

Recommended Stories