Horoscope 4th May : आज का राशिफल: ४ मे, सोमवार रोजी मानस, पद्म, परिघ, शिव आणि सर्वार्थसिद्धी नावाचे ५ शुभ-अशुभ योग दिवसभर राहतील. या योगांचा प्रभाव सर्व १२ राशींच्या लोकांवर होईल. जाणून घ्या तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा असेल...
४ मे २०२६ रोजी मेष राशीचे लोक प्रवासाला जाऊ शकतात आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहील. वृषभ राशीच्या लोकांनी दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये, विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ आहे. मिथुन राशीच्या लोकांचा खर्च वाढू शकतो, तर वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयोगी पडेल. कर्क राशीच्या लोकांनी वाहन जपून चालवावे, मुलांकडून सुख मिळेल. पुढे वाचा प्रत्येक राशीसाठी दिवस कसा असेल?
213
मेष राशिफल (Dainik Mesh Rashifal)
या राशीचे लोक प्रवासाला जाऊ शकतात. बिझनेस पार्टनरची साथ मिळेल. नोकरदार लोकांसाठी दिवस सामान्य आहे. इतरांना मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. पैशांची गुंतवणूक केल्यास फायदा होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. आरोग्य उत्तम राहील.
313
वृषभ राशिफल (Dainik Vrishbha Rashifal)
या राशीच्या लोकांचा जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला नाही. आक्रमक स्वभावामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. विचार न करता इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका.
नोकरदार लोकांसाठी दिवस फारसा चांगला नाही. खर्च जास्त होऊ शकतो. शेजाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. आईच्या आरोग्याची चिंता वाटेल. मित्रांच्या मदतीने बिघडलेली कामं मार्गी लागतील. मुलांच्या भविष्याची चिंता दूर होईल. वडीलधाऱ्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल.
513
कर्क राशिफल (Dainik Kark Rashifal)
आज ऑफिसमध्ये अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील. कुटुंबासोबतही चांगला वेळ जाईल. व्यवसायातील तुमची योजना यशस्वी होऊ शकते. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मुलांकडून सुख मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या.
613
सिंह राशिफल (Dainik Singh Rashifal)
या राशीच्या लोकांकडून घाईगडबडीत एखादी चूक होऊ शकते. मालमत्तेशी संबंधित वाद आणखी गुंतागुंतीचे होऊ शकतात. कोणाचातरी सल्ला घेऊनच पैसे गुंतवा, अन्यथा नुकसान होऊ शकते. आरोग्याबाबत सावध राहा. एखादा जुना आजार पुन्हा डोकं वर काढू शकतो.
713
कन्या राशिफल (Dainik Kanya Rashifal)
या राशीच्या लोकांना पार्ट टाइम जॉबची ऑफर येऊ शकते. व्यवसायासाठी वेळ चांगला आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. न विचारता कोणालाही सल्ला देऊ नका. रक्ताशी संबंधित आजार होऊ शकतात. विरोधकांचा सामना करावा लागू शकतो.
813
तुला राशिफल (Dainik Tula Rashifal)
तुमची विचारपूर्वक ठरवलेली कामं आज पूर्ण होऊ शकतात. तुमच्या चातुर्यामुळे जुने वाद मिटू शकतात. अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. लव्ह लाईफमध्ये अडचणी येऊ शकतात.
913
वृश्चिक राशिफल (Dainik Vrishchik Rashifal)
या राशीच्या लोकांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी. महत्त्वाच्या लोकांशी चर्चा होऊ शकते. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. आज एखादे महत्त्वाचे आणि मोठे काम सुरू होऊ शकते. समाजात मान-सन्मान मिळेल. कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल.
1013
धनु राशिफल (Dainik Dhanu Rashifal)
या राशीच्या लोकांची सुरू असलेली कामं अचानक थांबू शकतात. प्रेमसंबंध तुटू शकतात. कोणाशीतरी वाद होण्याचीही शक्यता आहे. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. एखादी महागडी वस्तू चोरीला किंवा हरवू शकते.
1113
मकर राशिफल (Dainik Makar Rashifal)
या राशीच्या लोकांना मोठ्या धनलाभाचे योग आहेत. आज तुम्हाला तुमच्या आवडीचे जेवण मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही दिवस चांगला आहे. अपचनाचा त्रास होऊ शकतो. वडिलांची तब्येत अचानक बिघडू शकते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून रागवू नका.
1213
कुंभ राशिफल (Dainik Kumbh Rashifal)
या राशीच्या अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. नोकरदार लोकांसाठी दिवस चांगला आहे. एखादी जुनी योजना आज यशस्वी होऊ शकते. घाईगडबडीत तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकता. मुलांच्या बाजूची चिंता सतावेल. गुंतवणूक न केल्यास उत्तम.
1313
मीन राशिफल (Dainik Meen Rashifal)
या राशीच्या लोकांना भविष्याबद्दल चिंता वाटू शकते. कोणाशीही वाद घालू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायाबाबत तुम्ही चांगला निर्णय घेऊ शकता. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
(Disclaimer : या लेखातील माहिती ज्योतिषांनी सांगितलेली आहे. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीला केवळ सूचनेप्रमाणे घ्यावे.)