Goa Budget Trip : गोव्याला जायचंय पण बजेटमुळे विचार करताय? अजिबात टेन्शन घेऊ नका! कमी पैशातही गोव्यात मनसोक्त धमाल करता येते. खिसा रिकामा न करता गोवा कसा फिरायचा, यासाठी या खास टिप्स नक्की वाचा.
अनेकांना वाटतं की गोवा ट्रिप खूप महाग असते, पण तसं अजिबात नाही! तुम्ही गोव्याचे बहुतेक बीचेस मोफत फिरू शकता. उत्तर गोव्यातील आरंबोल बीचवर संध्याकाळच्या प्रसिद्ध 'ड्रम सर्कल'चा अनुभव घ्या. शांतता हवी असेल, तर दक्षिण गोव्यातील पालोलेम बीच उत्तम पर्याय आहे. अगदी गजबजलेल्या कळंगुट आणि बागा बीचवरही तुम्हाला कमी खर्चात जेवणाचे आणि राहण्याचे अनेक पर्याय मिळतील.
24
गोव्यातील ऐतिहासिक किल्ले
गोव्याच्या किल्ल्यांवरून अरबी समुद्राचं विहंगम दृश्य दिसतं. पोर्तुगीजकालीन आग्वाद (Aguada) किल्ल्याला भेट देऊन तुम्ही समुद्र आणि लाईटहाऊस पाहू शकता; इथली एन्ट्री फी खूप कमी आहे किंवा काही भागांमध्ये तर मोफत प्रवेश आहे. आणि हो, 'दिल चाहता है' सिनेमानं प्रसिद्ध केलेला चापोरा किल्ला तर चुकवूच नका. इथून वागातोर बीचचा जबरदस्त व्ह्यू दिसतो.
34
ओल्ड गोव्यातील चर्च
ओल्ड गोव्यामधील युनेस्को-मान्यताप्राप्त चर्चेस तुम्ही मोफत फिरू शकता. बॅसिलिका ऑफ बॉम जिझस (Basilica of Bom Jesus) हे चर्च सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांसाठी ओळखले जाते आणि ते वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. पणजीमधील पांढरेशुभ्र 'अवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च' फोटो काढण्यासाठी एक परफेक्ट स्पॉट आहे. तसेच, पणजीच्या रंगीबेरंगी लॅटिन क्वार्टर, फाँटेनहासमधून (Fontainhas) फेरफटका मारण्याचा अनुभवही नक्की घ्या.
44
गोव्यातील ट्रिपसाठी खास टिप्स
पैसे वाचवण्यासाठी या काही भन्नाट टिप्स आहेत. प्रवासासाठी टॅक्सी खूप महाग पडतात, त्याऐवजी फक्त ₹300-₹500 मध्ये दिवसभरासाठी स्कूटर भाड्याने घ्या. जेवणासाठी महागड्या रिसॉर्ट्सऐवजी बीच शॅक्स आणि स्थानिक हॉटेल्समध्ये स्वस्त आणि चविष्ट गोवन फिश थाळीचा आस्वाद घ्या. राहण्यासाठी हॉटेलऐवजी हॉस्टेल किंवा होमस्टे निवडा. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या गर्दीच्या काळात खर्च जास्त असतो, त्यामुळे जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळात प्रवास करा. यावेळी राहण्याच्या खर्चात ५०% पर्यंत सूट मिळते. प्रो-टिप: नदी ओलांडण्यासाठी सरकारी फेरीबोटींचा वापर करा. पायी जाणाऱ्यांसाठी त्या पूर्णपणे मोफत आहेत!