Dahi Handi 2024 : मुंबईतील 5 मानाच्या दही हंडी आणि प्रसिद्ध गोविंदा पथक

Dahi Handi 2024 :  येत्या 26 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. तर 27 ऑगस्टला दही हंडीचा उत्सव आहे. मुंबई, ठाण्यात दही हंडीच्या उत्सवाची मोठी धूम पहायला मिळते. अनेक गोविंदा पथकांकडून दही हंडी फोडण्याचा प्रयत्न केला जातो. 

Chanda Mandavkar | Published : Aug 21, 2024 7:35 AM IST / Updated: Aug 21 2024, 02:42 PM IST

16
यंदा दही हंडीचा उत्सव कधी?

यंदा दही हंडीचा उत्सव येत्या 27 ऑगस्टला साजरी केली जाते. या दिवशी अनेक गोविंदा पथककांकडून उंचच उंच दही हंडी फोडण्याचा प्रयत्न केला जातो. खरंतर, दही हंडी उत्सवाची धूम मुंबई, ठाण्यात वेगळीच असते. दही हंडी फोडण्याचा सराव अनेक पथकांकडून उत्सवाच्या काही महिन्यांपासून सुरु होतो. अशातच मुंबईतील पाच मानाच्या हंडी आणि गोविंदा पथकांबद्दल जाणून घेऊया…

26
संस्कृती युवा प्रतिष्ठान

ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानकडून प्रत्येक वर्षी दही हंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या उत्सावात वेगवेगळ्या ठिकाणचे गोविंदा पथक येऊन दही हंडी फोडण्याचा प्रयत्न केला जातो. खरंतर, ठाण्यात देखील काही मानाच्या दही हंडी लावल्या जातात.

36
बाळ गोपाळ गोविंदा उत्सव, भायखळा

दही हंडी उत्सवाचा एक वेगळाच आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतो. दही हंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळालेला आहे. तर भायखळा येथील बाळ गोपाळ गोविंदा उत्सव पथक फार जुने मंडळ आहे. या मंडळाची शतकपूर्ती देखील झाली आहे. या पथकाची सुरुवात लालबाग आणि भायखळा परिसरातील कापड गिरणी कामगारांकडून करण्यात आली होती.

46
ताडवाडी गोविंदा पथक

ताडवाडी गोविंदा पथकाकडून दही हंडी वेळी लावल्या जाणाऱ्या थरांकडे प्रत्येकाचे लक्ष असते. मुंबईतच नव्हे तर ठाण्यात देखील ताडवाडी गोविंदा पथकाचा मोठा चाहता वर्ग आहे. 

56
जय जवान गोविंदा पथक

मुंबईतील सर्वाधिक थर लावण्याचा विक्रम जय जवान गोविंदा पथकाचा आहे. जय जवान गोविंदा पथकाचे मानवी मनोरे रचताना पाहताना डोळे उंचावलेलेच राहतात. वर्ष 2012 मध्ये ठाण्यातील टीएमसी शाळेच्या मैदानावर जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी दिली होती. तेव्हापासून अनेकवेळा या पथकाने आपला विक्रम कायम ठेवला आहे.

66
श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जीएसबी

मुंबईतील किंग्ज सर्कल येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जीएसबी हे सर्वाधिक जुने मंडळ ओखळले जाते. दहीहंडीसह गणपतीसाठी या मंडळाची ओखळ आहे. या मंडळाची दही हंडी पाहण्यासाठी अनेकजण गर्दी करतात.

आणखी वाचा : 

Krishna Janmashtami 2024 वेळी घरी आणा या 7 वस्तू, होईल धनाची भरभराट

Ganesh Chaturthi 2024 : केवळ 500 रुपयांत करा बाप्पाची आरास, पाहा DIY डेकोरेशन

Read more Photos on
Share this Photo Gallery
Recommended Photos