महिनाभर उपाशी पोटी प्या या बियांचे पाणी, आठवड्याभरात पोट होईल सपाट

धण्याचे पाणी एक नैसर्गिक उपाय म्हणून काम करतात. यामध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असल्याने धण्याचे पाणी प्यायल्यास पचनक्रिया सुधारणे, वजन कमी होणे, हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Coriander seeds Water Benefits : धण्याचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, जे तुमच्या अनेक आरोग्य समस्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या धण्यांमध्ये जीवनसत्त्वे अ, क आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. जाणून घेऊया धण्याचे पाणी पिण्याचे फायदे सविस्तर...

वजन कमी होण्यास फायदेशीर

धण्याच्या पाण्यामुळे शरीरातील फॅट्स बर्न होण्यास मदत होते, ज्यामुळे हळूहळू वजन कमी होते. त्यात डिटॉक्सिफायिंग गुणधर्म आहेत, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतो आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगवान होते.

पचनक्रिया सुधारते

धण्याच्या बियांचे पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामुळे गॅस, सूज आणि पोटदुखीसारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. धण्यामध्ये अँटिस्पास्मोडिक गुणधर्म असतात, जे पोटाच्या स्नायूंना आराम देतात आणि पचनक्रिया सुरळीत होते.

रक्तातील साखर नियंत्रणात राहते

धण्याच्या पाण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते. यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. दररोज धण्याचे पाणी पिल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते.

हृदय आरोग्य

धण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते आणि रक्त प्रवाह सुधारते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.

त्वचेचे आरोग्य

धण्यामध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे पिंपल्स आणि जळजळ यासारख्या त्वचेशी संबंधित समस्या कमी होतात. याशिवाय धण्याच्या पाण्यामुळे त्वचा चमकदार आणि हेल्दी राहण्यास मदत होते.

मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी

धण्याचे पाणी मूत्रपिंडांचे योग्य कार्य राखण्यास मदत करते. हे मूत्रपिंडात जमा झालेले हानिकारक घटक काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे किडनी स्टोन तयार होण्याचा धोका देखील कमी होतो.

असे तयार करा पाणी

धण्याचे पाणी बनवण्यासाठी, एक चमचा धणे पाण्यात भिजवा आणि रात्रभर तसेच ठेवा. सकाळी ते गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. दररोज असे केल्याने तुम्हाला आठवड्याभरात फायदे दिसून येतील.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

काळ्या घनदाट केसांचा राज विचारतील मैत्रिणी, भिंडीचा असा करा DIY उपयोग

उन्हाळ्यात अंडे की पनीर, काय खायला हवं?

Share this article