वजन कमी करणं हे आजकाल एक मोठं आव्हान बनलं आहे. कडक डाएट आणि तासनतास जिममध्ये घाम गाळूनही काहींचं वजन अजिबात कमी होत नाही. यामागे आपण करत असलेल्या काही छोट्या चुका कारणीभूत असतात. चला तर मग, या चुका कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
वजन कमी करणं हे फक्त डाएट आणि व्यायामावर अवलंबून नसतं. याचा थेट संबंध आपल्या संपूर्ण जीवनशैलीशी असतो. त्यामुळे वजन कमी करताना या चुका करणं टाळा.
25
पचनाची समस्या
आपण रात्री उशिरा जेवतो, तेव्हा अन्न पचायला शरीराला पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे आपण खाल्लेल्या कॅलरीजचं फॅटमध्ये रूपांतर होतं. झोपण्यापूर्वी जेवल्याने पचनाच्या समस्याही सुरू होतात.
35
कॅलरीज बर्न करा
शरीरातील चरबी जाळण्यासाठी पाणी खूप गरजेचं आहे. आपण कमी पाणी प्यायलो तर मेटाबॉलिझमची प्रक्रिया मंदावते. यामुळे आपल्याला वारंवार भूक लागते आणि आपण जास्त जेवतो.
आपण पित असलेला चहा, कॉफी आणि पॅकेट ज्यूस यातून नकळत अनेक कॅलरीज आपल्या शरीरात जातात. जास्त साखर असलेली पेये वजन वाढण्याचं मुख्य कारण आहेत. याने पोट भरल्यासारखं वाटत नाही, उलट चरबी वाढते.
55
प्रोटीन महत्वाच
स्नायूंच्या वाढीसाठी आणि चरबी कमी करण्यासाठी प्रोटीन खूप महत्त्वाचं आहे. आपल्या जेवणात प्रोटीन कमी असेल, तर भूक वाढते आणि जास्त खावंसं वाटतं. वजन कमी करण्याच्या डाएटमध्ये प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावतं.