Hair Care: केसांच्या चांगल्या वाढीसाठी आपण नियमित तेल लावतो. पण केसांना तेल नक्की कधी लावावे? सकाळी की रात्री झोपण्यापूर्वी? तज्ज्ञ याबद्दल काय सांगतात?
हेअर केअर म्हटलं की सर्वात आधी खोबरेल तेल आठवतं. आपल्या आजीच्या काळापासून आपण खोबरेल तेल वापरत आलो आहोत. खोबरेल तेल केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरतं. पण ते नक्की कधी लावावे, याबद्दल अनेकांच्या मनात शंका असतात. काही जण रात्री तेल लावण्याचा सल्ला देतात, तर काही जण आंघोळीपूर्वी तेल लावणे योग्य मानतात. काहींना सकाळी तेल लावणे आवडते. तेल जास्त वेळ डोक्यावर ठेवल्यास फायदा होतो, असाही एक समज आहे. पण यात किती तथ्य आहे? तज्ज्ञ काय सांगतात ते पाहूया.
23
आंघोळीच्या ३० मिनिटं आधी ते काही तास आधी
तुम्हाला केसांना तेल लावायचे असेल, तर केस धुण्यापूर्वी ३० मिनिटे ते काही तास आधी लावणे सर्वात उत्तम ठरते. यामुळे रात्रभर केस चिकट राहत नाहीत आणि तेलाला केसांवर काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, केस धुण्यापूर्वी तेल लावल्याने शाम्पू करताना केसांचे नुकसान होत नाही. आंघोळीपूर्वी खोबरेल तेल लावल्याने केस खराब होण्याचे प्रमाण कमी होते. खोबरेल तेल केसांच्या वाढीसाठी चमत्कार करत नसले तरी, ते केसांचे नुकसान नक्कीच टाळते.
33
केसांमध्ये तेल किती वेळ ठेवावे?
जर तुम्ही दिवसा केस धूत असाल, तर सकाळी तेल लावून ३० मिनिटांनी किंवा काही तासांनी केस धुणे योग्य ठरते. किंवा तुम्ही रात्री तेल लावून सकाळी केस धुतले तरी चालते. पण अनेकांना रात्रभर तेलकट डोक्याने झोपायला आवडत नाही. अशा लोकांनी केस धुण्यापूर्वी अर्धा तास आधी तेल लावले तरी पुरेसे आहे.
शाम्पू करण्यापूर्वी ३० मिनिटे ते काही तास तेल डोक्यावर ठेवणे योग्य असते. तेल जास्त वेळ डोक्यावर ठेवण्याची गरज नसते. कोरडे केस असणारे लोक नियमित तेल लावू शकतात, पण तेलकट केस असणाऱ्यांनी जास्त तेल लावण्याची गरज नाही.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.