रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. अशातच प्रभू श्रीरामांना नैवेद्यासाठी तुम्ही नारळाची खीर घरी बनवू शकता. जाणून घेऊया याची रेसिपी सविस्तर...
Chanda Mandavkar | Published : Jan 17, 2024 3:50 PM / Updated: Jan 17 2024, 03:59 PM IST
Coconut Kheer Recipe : रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे. या दिवशी तुम्ही प्रभू श्रीरामांना नैवेद्य काय दाखवायचा असा विचार करताय तर नारळाची खीर तयार करू शकता. जाणून घेऊया नारळाच्या खीरसाठी लागणारी सामग्री आणि कृती सविस्तर...
सामग्री
1 कप किसलेला ओला नारळ
3 कप फुल मलई दूध
4 चमचे कन्डेन्स्ड मिल्क
1/2 चमचे वेलची पावडर
1/4 चमचे बारीक बदाम
2 चमचे तूप
1 कप नारळ मलई
1/2 चमचे साखर
केशर
1/4 चमचे ड्राय फ्रुट्स
कृती
सर्वप्रथम एका पॅनमध्ये तूप, किसलेला ओला नारळ, बदाम, ड्राय फ्रुट्स टाकून गॅसच्या मंद आचेवर भाजून घ्या. सर्व गोष्टी भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढा.
एका टोपात तीन कप फुल मलई दूध दीड कप होईपर्यंत गरम करून घ्या. याशिवाय एका वाटीत नारळाची मलई, कन्डेन्स्ड मिल्क, वेलची पावडर आणि केशर या गोष्टी व्यवस्थितीत मिक्स करा.
दूधात भाजेला नारळ आणि ड्राय फ्रुट्स मिक्स करुन गॅस मध्यम आचेवर ठेवून पाच मिनिटे उकळवून घ्या. आता त्यामध्ये साखर मिक्स करा.
खीर घट्ट होण्यासाठी पाच मिनिटे शिजू द्या आणि त्यानंतर गॅस बंद करा. खीर थोडी थंड झाल्यानंतर प्रभू श्रीरामांना त्याचा नैवेद्य दाखवून घरातील मंडळींनाही खाण्यासाठी द्या.