डोकेदुखी, ताप येणे आणि थकवा येणे अशा लक्षणांसोबत आजार वाढला जातो. खासकरून गर्भवती महिला किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींना संसर्गजन्य आजार पटकन होऊ शकतात. अशातच केरळात सहा हजार जणांना कांजण्यांचा संसर्ग झाला आहे.
Chickenpox Symptoms and Prevention Tips : केरळात सध्या नागरिकांना कांजण्यांचा संसर्ग झाल्याची प्रकरणे अधिक वाढली आहेत. रिपोर्ट्सनुसार, गेल्या 75 दिवसात राज्यात कांजण्यांच्या संसर्गाची 6744 प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी नऊ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. कांजण्या हा आरएनए विषाणू आहे. या संसर्गात त्वचेवर लहान, लाल रंगातील पुरळ उठते.
गेल्या वर्षात केरळात 26 हजारांहून अधिक प्रकरणे कांजण्याची आढळून आली होती. या संसर्गामध्ये तुमचे डोके दुखणे, ताप येणे थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसून येण्यासह ती वाढली जातात. सर्वसामान्यपणे लहान मुलांना कांजण्यांचा संसर्ग पटकन होतो. याशिवाय गर्भवती महिला आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींना देखील कांजण्यांचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
कशाप्रकारे फैलावतो कांजण्यांचा संसर्ग?
कांजण्यांचा संसर्ग एखादा संक्रमित व्यक्ती शिंकल्याने, खोकल्याने अथवा त्याच्या थूंकीद्वारे फैलावला जातो. कांजण्यांच्या संसर्गावेळी त्वचेवर पुरळ येतात. याशिवाय कांजण्यांचा विषाणू व्यक्तीचे डोळे, नाक किंवा तोंडाद्वारेही शरिरात पसरला जाऊ शकतो. खासकरून, शाळा किंवा डे केअर सेंटरसारख्या गर्दीच्या वातावरणात रोगप्रतिकारक शक्ती किंवा लसीकरणाच्या अभावी कांजण्यांचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढली जाते.
कांजण्या संसर्गाची लक्षणे
कांजण्यांच्या संसर्गापासून असे राहा दूर
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
रंगपंचमीच्या रंगापासून अशी घ्या त्वचेची काळजी
सिगरेटपेक्षा आठ पटींनी अधिक धोकादायक बिडी, आरोग्य तज्ज्ञांनी केला धक्कादायक खुलासा