३. काम आणि जबाबदाऱ्यांबद्दल त्याचा दृष्टिकोन कसा आहे?
मुलगा किती पैसे कमवतो, फक्त या एका गोष्टीवर जोडीदार निवडणं योग्य नाही. तो त्याचं काम आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या किती गांभीर्याने घेतो, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
तो भविष्याचं काही प्लॅनिंग करतो का? स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यापासून पळ काढतो का? या गोष्टींकडे लक्ष द्या. आर्थिक परिस्थिती वेळेनुसार बदलू शकते, पण जबाबदारी घेण्याची वृत्ती संसारावर दीर्घकाळ परिणाम करते.
४. महिलांबद्दल त्याचा दृष्टिकोन कसा आहे?
लग्नाआधी तो महिलांच्या मतांचा आणि स्वातंत्र्याचा किती आदर करतो, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
तो त्याच्या घरातील महिलांशी कसा वागतो हे बघा. सोबतच तो तुमच्या आवडीनिवडी, निर्णय, नोकरी आणि वैयक्तिक गोष्टींचा आदर करतो का, हेही तपासा. समानता आणि एकमेकांचा आदर हाच सुखी संसाराचा पाया असतो.
५. राग आणि वाईट सवयींवर त्याचं नियंत्रण आहे का?
जर मुलाला खूप राग येत असेल, खोटं बोलण्याची सवय असेल, जुगार, जास्त दारू पिणं किंवा इतर कोणतंही व्यसन असेल, तर पुढे जाऊन संसारात खूप अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लग्नाआधी या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
जर एखादी व्यक्ती वारंवार तुमचा अपमान करत असेल, धमकावत असेल किंवा स्वतःच्या रागीट स्वभावाचं समर्थन करत असेल, तर ही गोष्ट खूप गांभीर्याने घ्या.
संसार सुखाचा होण्यासाठी फक्त पैसा किंवा चांगलं दिसणं पुरेसं नसतं. व्यक्तीचा स्वभाव, जबाबदारीची जाणीव, रागावर नियंत्रण आणि जोडीदाराबद्दलचा आदर या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आजकाल अनेक नाती लग्नानंतर काही वर्षांतच घटस्फोटापर्यंत पोहोचतात. याचं मुख्य कारण म्हणजे लग्नाआधी फक्त बाह्य सौंदर्य, संपत्ती आणि नोकरी बघून घेतलेला निर्णय. म्हणूनच आचार्य चाणक्य सांगतात की, लग्नाआधी मुलामध्ये हे ५ गुण नक्की तपासा आणि मगच पुढचं पाऊल उचला.