डार्क चॉकलेट की मिल्क चॉकलेट? कोणते आरोग्यासाठी फायदेशीर
मिल्क चॉकलेटच्या तुलनेत डार्क चॉकलेटमध्ये कोको पावडरचे प्रमाण अधिक असते. कोकोमध्ये फ्लेवोनोइड्स कपाउंड असतात. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
डार्क चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण अधिक असते. म्हणजेच यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. अँटी-ऑक्सिडेंट्स शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात.
डार्क चॉकलेटच्या तुलनेत मिल्क चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. अत्याधिक प्रमाणात साखरेचे सेवन केल्यास वजन वाढते. याशिवाय मधुमेहाचा धोकाही वाढला जातो.
काही अभ्यासातून समोर आले आहे की, डार्क चॉकलेटमुळे हृदयाचे आरोग्य राखले जाते. रक्त प्रवाह वाढला जातो आणि रक्तदाबाची समस्या कमी होते.
डार्क चॉकलेटमध्ये लोह, मॅग्नेशिअम आणि जस्त सारखे खनिज असतात. पण डार्क चॉकलेटमध्ये याचे प्रमाण अधिक नसते. मिल्क चॉकलेटच्या तुलनेत हे आरोग्यासाठी उत्तम असतात.
डार्क चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण ते मर्यादित प्रमाणात खावे. अत्याधिक प्रमाणात खाल्ल्याने कॅलरीज वाढल्या जाऊ शकतात.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.