घरच्याघरी रेस्टॉरंटसारखे चविष्ट फ्लॉवर मंच्युरिअन कसे बनवायचे याचीच रेपिसी आपण पाहणार आहोत. जाणून घेऊया यासाठी लागणारी सामग्री आणि कृती सविस्तरपणे.....
Chanda Mandavkar | Published : Dec 30, 2023 11:58 AM / Updated: Jan 02 2024, 10:54 AM IST
Cauliflower Manchurian Recipe : तुम्ही रेस्टॉरंट किंवा चाइजीनच्या स्टॉलवर फ्लॉवर मंच्युरिअन खाल्ले असतील. प्रत्येकाची फ्लॉवर मंच्युरिअन बनवण्याची पद्धत आणि चवं थोडीफार वेगळी असू शकते. पण घरच्याघरी देखील अगदी झटपट आणि चविष्ट फ्लॉवर मंच्युरिअन कसे बनवायचे याची रेसिपी पाहाणार आहोत. जाणून घेऊया फ्लॉवर मंच्युरिअनसाठी लागणारी सामग्री आणि कृती सविस्तर.....
सामग्री
एक फ्लॉवर
एक कप मैदा
एक चतुर्थांश कॉर्नफ्लोअर
एक चमचा आलं-लसूण पेस्ट
अर्धा चमचा काळी मिरी पावडर
चवीनुसार मीठ
एक चमचा लाल तिखट मसाला
पाणी
तेल
मंचुरियन सॉससाठी सामग्री
दोन मोठे चमचे तेल
एक चमचा लसूण
एक चमचा आलं
एक कांदा
दोन-तीन हिरवी मिरची
एक ढोबळी मिरची
दोन चमचे टॉमेटो सॉस
एक चमचा सोया सॉस
एक चमचा चिली सॉस
व्हिनेगर
कांद्याची पात
कोथिंबीर
कृती
सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट मसाला, काळी मिरी पावडर आणि मीठ मिक्स करून घ्या. या सर्व गोष्टी एकत्रित करून पीठ तयार करत त्यामध्ये थोडं-थोडं पाणी मिक्स करा.
फ्लॉवरचे तुकडे हे तयार करण्यात आलेल्या मंचुरियनच्या पीठात मिक्स करा. फ्लॉवर मंच्युरिअन डीप फ्राय करण्यासाठी कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
तेल गरम झाल्यानंतर फ्लॉवर मंच्युरिअनसाठी तयार करण्यात आलेल्या पीठाचे लहान आकाराचे गोळे तयार करून घ्या. मंच्युरिअनला तपकिरी रंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. मंच्युरिअन तळून झाल्यानंतर ते एका भांड्यात काढून ठेवा.
मंचुरिअन सॉस तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करा. यामध्ये चिरलेली लसूण, आलं, हिरवी मिरची तेलात परतून घ्या. आता चिरलेला कांदा, ढोबळी मिरची देखील तेलात टाकून एक-दोन मिनिटांसाठी शिजवा.
पॅनमध्ये शिजवण्यात आलेल्या भाज्यांमध्ये टोमॅटो सॉस, सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर, साखर आणि मीठ टाका. या सर्व गोष्टी व्यवस्थितीत मिक्स करून त्यामध्ये थोडं पाणी टाका आणि मंद आचेवर सॉस शिजवून घ्या.
कॉर्नफ्लोअरमध्ये थोडं पाणी मिक्स करून तयार करण्यात आलेल्या मंच्युरिअन सॉसमध्ये टाका. सॉस घट्ट होईपर्यंत तो शिजवून घ्या.
आता तळलेले फ्लॉवर मंच्युरिअन हे सॉसमध्ये मिक्स करा. मंचुरियन सॉसमध्ये व्यवस्थितीत हलवून एक-दोन मिनिट मंद आचेवर शिजण्यास ठेवा.
गॅस बंद करून मंच्युरिअनवरुन बारीक चिरलेली कांद्याची पात, कोथिंबीर टाका आणि एका प्लेटमध्ये खाण्यासाठी गरमागरम फ्लॉवर मंच्युरिअन शेजवान चटणीसोबत सर्व्ह करा.