Buddha Purnima 2024 : हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला फार महत्त्व आहे. या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी काही शुभ वस्तू घरी आणल्याने आयुष्यात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Buddha Purnima 2024 : वैदिक पंचांगानुसार प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या तिथीला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी बुद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. धर्म शास्रानुसार, गौतम बुद्धांना भगवान विष्णूंचा नववा अवतार मानले जाते.
यंदाच्या वर्षी बुद्ध पौर्णिमा 23 मे ला साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, बुद्ध पौर्णिमेला भगवान विष्णू आणि गौतम बुद्धांची विशेष पूजा केल्याने आयुष्यात फळ मिळते. याशिवाय ज्योतिष शास्रात सांगितल्यानुसार, काही वस्तू घरी आणल्यास आयुष्यात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
चांदीचे नाणे
चांदीचा संबंध चंद्र देवतेशी आहे. यामुळे बुद्ध पौर्णिमेला घरी चांदीचे नाणे आणल्यास आयुष्यात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. याशिवाय घरात सुख-समृद्धी येते.
पितळेचा हत्ती
बुद्ध पौर्णिमेला पितळेचा हत्ती घरी आणल्याने लाभ होतो. याला शुभतेचे प्रतीक मानले जाते. पितळेच्या हत्तीमुळे आर्थिक वृद्धी होण्यासह आयुष्यातील काही समस्या दूर होतात.
श्री यंत्र
पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची उपासना केली जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाटी श्री यंत्राची पूजा करणे महत्त्वपूर्ण मानले जाते. अशाच बुद्ध पौर्णिमेला श्री यंत्र घरी आणू शकता. यामुळे आर्थिक समस्या दूर होतील.
गौतम बुद्धांची प्रतिमा
वास्तु शास्रात आणि फेंगशुईमध्ये असे सांगण्यात आले आहे की, ज्या घरात गौतम बुद्धांची प्रतिमा असते तेथे नेहमीच सकारात्मक उर्जेचा वास असतो. अशीही मान्यता आहे की, यामुळे घर-परिवारात सुख-समृद्धी येते.
का साजरी केली जाते बुद्ध पौर्णिमा?
बुद्ध पौर्णिमा भगवान बुद्धांचा जन्म, सत्याचे ज्ञान आणि महापरिनिर्वाणच्या रुपात मानली जाते. बुद्ध पौर्णिमा केवळ बुद्धांच्या जन्माशी संबंधित नसून अनेक वर्ष वनांमध्ये फिरत कठोर तपस्या करत बोधगया येथे बोधिवृक्षाखाली बुद्धांना ज्ञानप्राप्ती केल्यासंबंधितही आहे.
गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना करत जगाला शांती, सत्य आणि मानवतेच्या सेवेचा संदेश दिला होता. याशिवाय पंचशीलेही दिली. ही पंचशीले म्हणजे व्यभिचार न करणे, खोटे न बोलणे, चोरी न करणे, हिंसा न करणे आणि मादक पदार्थांचे सेवन करू नये.
(.DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
मृत मुलीच्या लग्नासाठी जाहिरात, घरातील मंडळी नवरदेवाच्या शोधात