एका परिवाराकडून 30 वर्षांधी मृत्यू झालेल्या मुलीसाठी नवरदेवाचा शोध घेतला जात आहे. यासाठी परिवाराने जाहिरातही दिली आहे. यामध्ये आम्ही मुलीसाठी नवरदेव शोधतोय असे म्हटले आहे.
कर्नाकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर येथील प्रकरण आहे. येथेच मृत मुलीचा परिवार राहतो. अशातच आता प्रश्न निर्माण होतोय, मृत मुलीसाठी नवरदेव जीवंत हवाय की मृत्यू झालेला?
परिवाराने जाहिरातीमध्ये लिहिले आहे की, मृत मुलीसाठी अशा नवरदेवाचा शोध घेतोय जो 30 वर्षांपूर्वी मृत्यू पावला आहे. असा नवरदेव तुमच्या पाहण्यात असल्यास कृपया आम्हाला संपर्क करा.
वृत्तपत्रातील जाहिरातीत असेही म्हटलेय की, कुलाल जातीचा आणि बंगेरा गोत्र असलेल्या तरुणाचा शोध घेत आहोत.
भारतातील दक्षिण कन्नडच्या एका जातीमध्ये मृत अविवाहित मुलांचा विवाह करण्याची प्रथा पार पाडली जाते. यामध्ये मृत व्यक्तींच्या आत्माचे लग्न लावून दिले जाते.
भूताटक्यांच्या लग्नात सामान्य लग्नाप्रमाणे सर्व विधी केल्या जातात. यावेळी केवळ नवरदेव आणि नवरी यांचा मृत्यू झालेला असतो. दोघांच्या आत्म्यासोबत लग्नाच्या विधी पार पाडल्या जातात.
मृत आत्मांना मोक्ष मिळण्यासाठी लग्न लावून दिले जाते. या विधी तुलुनाडु-दक्षिण कन्नड आणि उडुपीच्या समुद्र किनाऱ्यावरील जिल्ह्यात प्रेथा कल्याण प्रथा पार पाडली जाते.