Bhogi 2025 निमित्त मित्रपरिवाराला मराठमोळ्या शुभेच्छा पाठवून साजरा करा सण

Published : Jan 13, 2025, 08:53 AM ISTUpdated : Jan 13, 2025, 08:54 AM IST
Bhogi 2024

सार

Bhogi 2025 : आज देशभरात भोगीचा सण साजरा केला जात आहे. या सणाला देशात वेगवेगळ्या नावाने ओखळले जाते. अशातच यंदाच्या भोगीनिमित्त मित्रपरिवाराला खास मराठमोळ्या शुभेच्छा पाठवा. 

Bhogi 2025 Wishes in Marathi :  'न खाई भोगी तो सदा रोगी’असे भोगीच्या वेळी हमखास बोलले जाते. आज देशभरात वेगवेगळ्या नावाने भोगीचा सण साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात, तेलंगणा, कर्नाटकसह श्रीलंका येथे भोगीचा सण साजरा केला जातो. अशातच भोगीनिमित्त मित्रपरिवाराला खास मराठमोळ्या शुभेच्छा, फेसबुक पोस्ट, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटससाठी खास मेसेज पाठवून आजचा सण साजरा करा.

भोगी 2025 निमित्त खास शुभेच्छा 

नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
भोगी आणि मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

संक्रांतीचा पहिला सण
'भोगी' च्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!

दु: ख असावे तीळा सारखे
आनंद असावा गुळासारखा
तुमचे अवघे जीवन असावे तीळगुळासारखे
भोगी व मकर संक्रांत सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

हिरवा हरभरा तरारे गोड थंडीचे शहारे गुलाबी ताठ ते गाजर तीळदार अन् ती बाजर 'भोगी' च्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!

भोगीच्या भाजीची चव असते न्यारी... सर्व सणांमध्ये मनमोहक असते भोगीची तयारी... भोगी सणाच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!

आणखी वाचा : 

Makar Sankranti: घरच्या घरी तिळाचे लाडू पटकन बनवा, प्रोसेस जाणून घ्या

मकर संक्रांतीच्या वाणात द्यायच्या ५ खास भेटवस्तू,

 

PREV

Recommended Stories

अंबानींच्या ज्वेलरी कलेक्शनची चर्चा! २०२५ मध्ये टॉपवर असलेले नीता-ईशाचे १० सर्वाधिक महागडे आणि स्टायलिश दागिने पाहा!
फक्त ₹700 मध्ये! 'या' 1 ग्राम गोल्ड चेन डिझाईन्स पुढे खरं सोनंही फिकं पडेल!