सोनाराकडे नव्हे घराच्याघरी या वस्तूंनी चमकवा ज्वेलरी, वाचा DIY हॅक्स

सोने, चांदी किंवा आर्टिफिशियल ज्वेलरी घरच्याघरी देखील स्वच्छ करता येते. यासाठी चहापावडर, बेकिंग सोडाचा वापर करू शकता. जाणून घेऊया घरच्याघरी सर्व प्रकारची ज्वेलरी कशी स्वच्छ करायची यासाठीचे काही हॅक्स...

DIY Hacks for Jewellery Cleaning : सोने, चांदी किंवा आर्टिफिशियल ज्वेलरी प्रत्येक महिलेकडे असते. साडीसोबत मॅचिंग नेकलेस-कानातले खरेदी करण्यासाठी महिला हजारो रुपये खर्च करतात. पण ज्वेलरीची योग्य काळजी न घेतल्यास त्याची कालांतराने चमक दूर होऊ लागते. एवढेच नव्हे काही ज्वेलरी खराब होऊन मोडल्या जातात. अशातच ज्वेलरीची चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी पुढील काही DIY हॅक्स नक्की वापरु शकता.

वापरलेली चहापावडर

चांदीची ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या चहापावडरचा वापर करू शकता. अथवा पाणी आणि चहापावडर उकळवून त्यामधील पाणी काढून टाका. यानंतर एका वाटीमध्ये वापरलेली चहापावडर घेऊन त्यामध्ये बेकिंग सोडा, डिटर्जेंट मिक्स करुन पेस्ट तयार करा. या मिश्रमात चांदीची ज्वेलरी थोडावेळ बुडवून ठेवा. 10-15 मिनिटांनी ज्वेलरी स्वच्छ पाण्याने धुवा. असे केल्याने चांदीची ज्वेलरी पुन्हा चमकेल.

सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची ट्रिक

सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठीही चहापावडरचा वापर करू शकता. यामध्ये बेकिंग सोडा, डिटर्जेंटसह थोडी हळद मिक्स करा. यामुळे ज्वेलरीची चमक पुन्हा येथील. या ट्रिकमध्ये चहासाठी तयार केलेल्या पाण्याचा वापर करा.

आर्टिफिशियल ज्वेलरी स्वच्छ करण्याची ट्रिक

आर्टिफिशियल ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी कोमट पाणी आणि माइल्ड डिश वॉशरचा वापर करा. याचे मिश्रण तयार करुन त्यामध्ये आर्टिफिशियल ज्वेलरी बुडवून ठेवा. यानंतर ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. ज्वेलरी धुतल्यानंतर पुसण्यासाठी स्वच्छ कापडाचा वापर करा. आर्टिफिशियल ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी बेकिंस सोडा बेस्ट पर्याय आहे. यासाठी पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करुन ब्रशने ज्वेलरीवर लावून स्वच्छ करा.

आणखी वाचा : 

Rajwadi-Polki पासून वेगळे काही हवंय, पाहा मीनाकारी बांगड्यांचे डिझाइन

कमी बजेटमध्ये घर सजवण्याचे सोपे उपाय

Share this article