Relationship Tips : संशयामुळे तुमच्या नात्यात आलाय दुरावा? पटकन अशा करा शंका दूर

Relationship Tips : तुमच्याही नात्यात प्रेम, माया, आपुलकीऐवजी संशयाने जागा घेतली आहे का? तर नात्यातील कटुता कमी करण्यासाठी लगेचच जाणून घ्या या सोप्या टिप्स…

 

Harshada Shirsekar | Published : Nov 2, 2023 11:52 AM IST / Updated: Nov 02 2023, 05:35 PM IST
18
संशयाची किड

नातेसंबंध पती-पत्नीचे असो किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचे, प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या नात्यात (Relationship Tips) संशय निर्माण होणे अतिशय घातक ठरू शकते. संशयामुळे तुमची कित्येक जवळची नाती बिघडू शकतात. त्यामुळे नाती वाचवण्यासाठी संवाद साधून वाद मिटवा. पण संवादच संपला की नात्याला संशयाची किड लागते. जास्त प्रेम करणाऱ्या व्यक्तीलाच या सर्व गोष्टींचा सामना करावा लागतो, असे बऱ्याच प्रकरणांमध्ये पाहायला मिळते. अनेकदा वेळ असतानाही पार्टनरकडून बोलण्यासाठी-भेटण्यासाठी वेळ नसल्याचे खोटे सांगितले जाते आणि मग सुरू होतात फक्त वाद आणि वादच…

28
असे टिकवा नाते

जोडीदार आपल्याला सतत टाळतोय, समजून घेत नाहीय; हे लक्षात येताच त्याच्या/तिच्या मनात संशय निर्माण होणे सहाजिकच आहे. संशयाची परिस्थिती निर्माण होण्यासाठी दोन्ही व्यक्ती जबाबदार असतात. पण वेळीच यावर तोडगा काढण्याऐवजी सतत वाद-भांडणे करत बसलात, तर कदाचित चांगले नाते संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमचे नाते (Relationship Tips In Marathi) टिकवून ठेवायचं असेल तर जाणून घ्या या सोप्या टिप्स..

38
मनातील भावना व्यक्त करा

नाते मजबूत असण्यासाठी त्यामध्ये प्रेम-माया (Possessive Partner In A Relationship)असणे फार गरजेचं आहे. तुमच्या नात्यातील प्रेमाची जागा संशयाने घेतली आहे तर ही धोक्याची घंटा आहे. अशा परिस्थितीत नातेसंबंध तुटण्यापासून वाचवण्यासाठी आणि जोडीदाराबद्दल असलेल्या मनातील शंका दूर करण्यासाठी शक्य होईल तितके सर्व प्रयत्न करा. कोणत्याही पुराव्याशिवाय पार्टनरवर संशय घेणे थांबवा. जोडीदाराशी मन मोकळे करून बोला आणि तुमच्या मनात नेमका काय गोंधळ सुरू आहे, तो शब्दांद्वारे व्यक्त करा. पण दुसऱ्या जोडीदारानेही या प्रयत्नांस साथ देणे गरजेचं आहे. यासाठी पार्टनरचे म्हणणे ऐकणं व समजून घेणे आवश्यक आहे.

(अंबानींच्या कार्यक्रमात करण जोहरला आला होता एंझायटी अटॅक, जाणून घ्या कारणे व लक्षणे)

48
खात्री पटवून देणे

नाते अधिक मजबूत होण्यासाठी जोडीदाराला काही गोष्टींबद्दल खात्री पटवून देणे गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण त्याचे खूप चांगले मित्र आहात आणि तुम्ही देखील त्याच्या/तिच्याकडून अशाच भावनांची अपेक्षा करत आहात, हे त्यांना सांगा. जितके शक्य होईल तितके पार्टनरसोबत (How To Deal With Possessive Partner) वेळ घालवा. डिनर डेट, लंच डेटचा प्लान आखा, सिनेमा पाहायला एकत्र जा. तुमच्यासाठी तुमचा पार्टनर किती महत्त्वाचा व खास आहे, याची जाणीव त्याला करून द्या.

(Habits Of Successful People : आयुष्यात तुम्हालाही व्हायचंय यशस्वी? मग फॉलो करा या 6 सवयी)

58
लोकांच्या कुजबूजण्यावर लक्ष देऊ नका

कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना। तिसऱ्याच व्यक्तीने येऊन तुमच्या पार्टनरबद्दल तुमचे कान भरले तर त्याकडे दुर्लक्ष करा. कारण बऱ्याचदा एखाद्याचे मजबूत नाते पाहून लोकांच्या पोटात दुखतेच. कोणी येऊन तुमच्या पार्टनरबद्दल काही वाईट गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे ऐका व समजूतदारपणे प्रकरण हाताळा. त्यांचे बोलून झाल्यानंतर कोणत्या आधारे ती व्यक्ती तुमच्या जोडीदारावर आरोप करतेय, याचा पुरावा मागा. पुरावा न दिल्यास उगाचच जोडीदारावर संशय (How To Deal With Doubting Partner) घेऊन नका. कारण कधी-कधी सांगोवांगी गोष्टींमुळे नात्यात दुरावा निर्माण होतो.

(Child Health Care : मुलांची चॉकलेट खाण्याची सवय सोडवण्यासाठी उपाय शोधताय? जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती)

68
एकमेकांना स्पेस द्या

नाते कोणतेही असो पण प्रत्येक व्यक्तीला स्वतःची स्पेस मिळणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकालाच ‘मी टाइम’ प्रिय असतो. यामुळेच वैयक्तिक जीवनात सुधारणा होण्यास मदत मिळते. जोडीदार ऑफिस किंवा खासगी आयुष्यातील कामात व्यस्त असेल आणि तुम्हाला वेळ देऊ शकला/शकली नाही, तर ते तुम्हाला फसवत आहेत; असा अर्थ होत नाही. कारण महत्त्वाच्या कामामुळे सध्या बोलणं किंवा भेटणे होऊ शकत नाही, इतकेच. पण व्यस्त असणारा व्यक्तीही काही मिनिटे वेळ काढून आपल्या पार्टनरशी नक्कीच बोलू शकतो. कारण जगात इतकेही कोणी व्यस्त नसते.

78
स्वतःला जोडीदाराच्या जागी ठेवून पाहा

प्रेम असणाऱ्या-आवडणाऱ्या व्यक्तीला मिळवण्यासाठी सुरुवातीला फार धडपड केली जाते. एकदा का त्या व्यक्तीची आयुष्यात एण्ट्री झाली की ती पूर्वी होणारी धडपड नाहीशीच होते. नातेसंबंध निर्माण झाल्यानंतर जोडीदाराला वेळ देण्यासाठी सतत कारणांचा पाढा वाचला जातो. तुम्ही असे करत असाल तर वेळीच सावध व्हा आणि या वाईट सवयी टाळा. कारण सतत होणारे वाद-भांडणं व नात्यातील संशय-कटुतेचे हेच मूळ आहे. वाद टाळायचे असतील संवाद होणे खूप गरजेचं आहे. जोडीदाराला नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे त्रास होतोय? कोणत्या गोष्टीमुळे त्याची/तिची घुसमट होतेय? हे जाणून घ्या. नात्यातील गुंता एकाच व्यक्तीने नव्हे, तर दोघांनीही सोडवणे गरजेचं आहे. पार्टनरच्या काही गोष्टी ऐकून घ्या आणि त्यांना समजावण्याचाही प्रयत्न करा.

88
तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Share this Photo Gallery