हसताय ना मंडळी? जाणून घ्या लाफ्टर योगचे अगणित फायदे
Lifestyle Nov 06 2023
Author: Harshada Shirsekar Image Credits:Getty
Marathi
हसणं का आहे गरजेचं?
घरात किंवा एखाद्या पार्कमध्ये आपण वृद्धांना तसंच तरुणांना लाफ्टर थेरपी किंवा लाफ्टर योग करताना पाहिले असेलच. यासाठी लोक ग्रुप करून एकत्रित येतात व मोठमोठ्याने हसतात.
Image credits: Getty
Marathi
लाफ्टर थेरपी
लाफ्टर थेरपीचे फायदे माहिती आहेत का? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credits: Getty
Marathi
लाफ्टर थेरपी म्हणजे नेमके काय?
लाफ्टर थेरपीची सुरुवात स्मित हास्याने केली जाते. यानंतर मार्गदर्शक ग्रुपमधील लोकांना मोठमोठ्याने हसण्यास सांगतात. सर्वजण एकत्रित आनंदाने हा व्यायाम करतात.
Image credits: Getty
Marathi
स्नायूंचा होतो व्यायाम
मोठमोठ्याने हसण्याने चेहऱ्यांच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होतो. ज्यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढण्यास मदत मिळते. महत्त्वाचे म्हणजे मानसिक तणाव कमी होतो.
Image credits: Alaya F Instagram
Marathi
रोगप्रतिकारक शक्ती
लाफ्टर थेरपीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मानसिक तणावामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे आजारांची लागण होण्याचा धोका वाढतो.
Image credits: Getty
Marathi
रक्तप्रवाह वाढतो
हसण्याचा व्यायाम केल्याने शरीरातील रक्तप्रवाह अधिक चांगला होतो. शरीराला ऑक्सिजन वायूचा पुरवठा देखील उत्तम प्रकारे होतो.
Image credits: Getty
Marathi
मधुमेहींसाठी लाभदायक
दररोज हसण्याचा व्यायाम केल्यास मधुमेहाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. याशिवाय नैराश्यावरही मात करता येते.
Image credits: Getty
Marathi
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
हसण्याचा व्यायाम हृदयासाठी लाभदायक आहे. मोठमोठ्याने हसल्यास शरीरात हॅपी हार्मोन्सचा स्त्राव अधिक प्रमाणात होतो. यामुळे तणाव दूर होऊन हृदयाचे कार्य सुरळीत सुरू राहते.
Image credits: Getty
Marathi
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.