सुटलेले पोट कमी करायचेय? दररोज 10 मिनिटे करा हे काम

सध्या बिघडलेल्या लाइफस्टाइमुळे बहुतांशजणांना लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अशातच सुटलेले पोट कमी करण्यासाठी व्यायाम ते डाएटचा आधार घेतला जातो. तरीही काहींचे सुटलेले पोट कमी होत नाही. यावरचा सोपा उपाय जाणून घेऊया...

Chanda Mandavkar | Published : Apr 5, 2024 7:29 AM IST / Updated: Apr 05 2024, 01:04 PM IST

Belly Fat Reduce Tips : वाढत्या वयासह शरिरात फॅट बर्न (Fat Burn) होण्याची प्रक्रिया मंदावली जाते. यामुळेच शरिरात फॅट्स अधिक वाढले जातात. अशातच वाढत्या वयातील व्यक्तींचे पोट सुटलेले तुम्ही पाहिले असेल. वयाच्या 40 वर्षावरील बहुतांश व्यक्तींमध्ये पोट सुटल्याची समस्या दिसून येते. सुटलेले पोट कमी करणे काहींसाठी आव्हानात्मक असते. पण तुम्ही सुटलेले पोट कमी करू शकता. यावर एक सोपा उपाय आहे.

महिला आणि पुरुषांमधील हार्मोन्सचा स्तर
महिला आणि पुरुषांमधील हार्मोन्सचा (Harmons) स्तर वयानुसार कमी होत जातो. अशातच पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी झाल्यास त्यांचे स्नायूही ठिसूळ होऊ लागतात आणि पोटाच्या आसपास फॅट जमा होतात. पण पोटावरील चरबी काही प्रमाणात कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला दररोज 10 मिनिटे एक काम करावे लागणार आहे.

दररोज 10 मिनिटे चाला
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कामाचा ताण आणि बिघडलेली लाइफस्टाइल यामुळे व्यायाम करण्यास काहींना वेळ मिळत नाही. यामुळे शरिरातील कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया मंदावली जाते. खाण्यापिण्याकडेही बहुतांशजण दुर्लक्ष देतात. अशातच दररोज 10 मिनिटे चालल्याने शरिराला फार मोठा फायदा होऊ शकतो. याशिवाय पुरेशी झोप घेणेही महत्त्वाचे आहे.

ब्रिस्क वॉक वर्कआउट
ब्रिस्क वॉक (Brisk walking) वर्कआउट म्हणजे वेगाने चालणे. यामुळे अत्याधिक कॅलरीजचे सेवन करण्यापासून तुम्ही दूर राहता. याशिवाय उत्तम झोपही लागते. वजन देखील कमी होते. मात्र पुरेशी झोप न घेतल्यास वजन कमी होत नाही.

हाय इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंग
वजन कमी करण्यासाठी हाय इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंगचीही (High Intensity Interval Training)  मदत घेऊ शकता. यामध्ये वेगाने वाढलेले वजन आणि सुटलेले पोट कमी होऊ शकते. पहिल्यांदाच हाय इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंग करणार असल्यास जिम ट्रेनरची मदत घ्या.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Health Tips : निरोगी जीवन जगायचं असेल तर,किमान 30 मिनिटे चालायलाच पाहिजे

आयुष्यातील या 3 सवयी आजच बदलण्याची चाणक्यांनी दिलाय सल्ला, अन्यथा...

महिलांनो काम आणि कौटुंबिक जीवनातील संतुलन राखण्यासाठी नक्की वाचा...

Share this article